Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस जवानाने आपल्याच सहकाऱ्यावर केला गोळीबार

एटापल्ली येथील घटना, जखमी जवानावर नागपुरात उपचार सुरू.

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

एटापल्ली 29 ऑगस्ट :- सकाळच्या सुमारास गस्तीवर असलेल्या शीघ्रकृती दलाच्या पथकातील एका जवानाने सहकाऱ्यावर गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना एटापल्लीपासून जवळच असलेल्या आलदंडी मार्गावर घडली आहे. गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष सिडाम असे आरोपी जवानाचे नाव असून विजय करमे असे जखमी जवानाचे नाव आहे. 

एटापल्ली उपविभागीय पोलीस कार्यालयाच्या अखत्यारीत येत असलेल्या शीघ्रकृती दलाच्या पथकातील शीघ्रकृती दलाचे जवान आज सकाळी गस्तीवर होते. दरम्यान, संतोष आणि विजय या दोन जवानांमध्ये वाद झाला. यातून संतोषने विजयवर थेट गोळीबार केला. यात विजय गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ हेलिकॉप्टरमधून नागपूर येथे नेण्यात आले. सध्या जखमी जवानाची प्रकृती स्थिर आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

धावत्या 108 रुग्णवाहिकेचं चाक निखळले…BVG चा भोंगळ कारभार रुग्णांच्या जीवावर बेततोय..

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.