Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

PMKISAN योजना अंतर्गत सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केले निधीचे हस्तांतरण

निधी हस्तांतरण कार्यक्रम दिल्ली येथून ऑनलाइन पार पडला.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि.15 मे : दिनांक 14 मे 2021 रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते प्रधानमंत्री किसान सन्मान निधि योजना (PMKISAN) अंतर्गत देशातील 9.50 कोटी लाभार्थी शेतकऱ्यांना आठव्या हप्त्यातील (एप्रिल, 21 ते जुलै, 21) रू. 19,000/- कोटीहून अधिक रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण कार्यक्रम दिल्ली येथून ऑनलाइन पार पडला.

आता हस्तांतरित केलेली रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामात बियाणे, खते, औषधे सारख्या कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

फेब्रुवारी, 2019 मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून देशातील 10 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना आत्तापर्यंत रू. 1.15 लाख कोटीहून अधिक रकमेचा लाभ देण्यात आला आहे .

महाराष्ट्र राज्यात या योजने अंतर्गत सुरुवातीपासून दिनांक 13 मे, 2021 अखेर 105.30 लाख लाभार्थी शेतकऱ्यांना एकूण रु. 11,694/- कोटी रकमेचा लाभ हस्तांतरित झाला आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तसेच आजच्या दि. 14.05.2021 रोजीच्या कार्यक्रमात दिनांक 1 एप्रील, 2021 ते दिनांक 31 जुलै, 2021 या कालावधीकरिता देय आठव्या हप्त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील एकुण 95.91 लाख पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना साधारण रू. 1918 कोटीचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केला गेला.

चालू वर्षी भारतीय हवामान विभागाने सरासरीच्या 98% पाऊस पडण्याचे  अनुमान जाहीर केले आहे. पाऊस वेळेवर सुरू होऊन जून मध्ये पेरणीच्या दृष्टीने हा लाभ खरीप 2021 हंगामात साठी विविध कृषी निविष्ठां खरेदीसाठी शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे. या मुळे कृषी उत्पादन वाढीला चालना मिळणार आहे असे आयुक्त (कृषि) तथा राज्यस्तरीय अंमलबजावणी प्रमुख पी.एम. किसान, कृषि आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांनी कळविले आहे.

हे देखील वाचा :

(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स च्या ५६ जागांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात 40 जागांसाठी भरती

जिल्हा प्रशासनाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याचे पालकमंत्री यांचे निर्देश

Comments are closed.