Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वैधानिक विकास महामंडळावरून अजितदादा-फडणवीसांची जुंपली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

मुंबई डेस्क दि ०१ मार्च : वैधानिक विकास महामंडळाच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुंपली. राज्यपालांनी १२  सदस्यांची नियुक्ती जाहीर करताच वैधानिक विकास महामंडळाची स्थापना करू, असं अजित पवार यांनी सांगितलं. त्याला फडणवीस यांनी कडाडून विरोध केला. दादांच्या पोटातले ओठावर आले. हा विदर्भ-मराठावाड्यातील जनतेला ओलीस ठेवण्याचा प्रयत्न आहे, अशी घणाघाती टीका फडणवीस यांनी केली.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज सुरू होताच मराठवाडा, विदर्भातील वैधानिक विकास महामंडळाच्या स्थापनेचा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुद्दा उपस्थित केला. वैधानिक विकास महामंडळाची पुनर्स्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार काही करत नाही. या राज्यात मराठवाडा आणि विदर्भातील लोक राहतात, हे लक्षात ठेवा, असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. त्यावर अजित पवार यांनी विदर्भ आणि मराठवाडा विकास महामंडळ आम्ही स्थापन करणार आहोत. बजेटमध्ये तसा निधीही ठेवला आहे. ज्या दिवशी राज्यपाल १२ आमदारांची नावं जाहीर करतील त्या दिवशी वैदानिक विकास महामंडळ घोषित करू, असं पवार यांनी स्पष्ट केलं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अर्थसंकल्पावर एक शब्दही बोलणार नाही. आ.सुधीर मुनगंटीवार

१२ आमदारांशी आमचं काही घेणंदेणं नाही. तुम्ही कुणाची नावं दिली हे सुद्धा आम्हाला माहीत नाही. तुम्ही १२ चे २४  आमदार करा, त्यांच्याशी आमचं काहीही घेणंदेणं नाही. तुम्हाला हातजोडून विनंती आहे, आजच वैधानिक विकास महामंडळ जाहीर करा. हवं तर मी अर्थसंकल्पावर बोलणार नाही

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

वैधानिक विकास महामंडळ स्थापन करुन निधीची तरतूद करणार ,उपमुख्यमंत्री अजित पवार

वैधानिक विकास महामंडळाच्या अनुषंगाने कुणीही राजकारण करू नये. आम्ही महामंडळ तयार करणारच आहोत. उद्याच्या अर्थसंकल्पात महामंडळ अस्तित्वात आहे असं गृहित धरूनच आम्ही निधीची तरतूद करणार आहोत. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी एक पैसाही आम्ही कमी पडू देणार नाही

Comments are closed.