Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंजेक्शनचा काळाबाजार करणारे क्राईस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉ. जावेद सिद्दीकी यांना अटक

डॉक्टरला मदत करणाऱ्या दोन नर्सेसना देखील पोलिसांनी घेतले ताब्यात.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

चंद्रपूर – रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या क्राईस्ट रुग्णालयातील आयसीयूचे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना गुरुवार दुपारी झालेल्या अटकेनंतर पोलीस तपासात धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील ICU चे प्रभारी डॉक्टर जावेद सिद्दीकी यांना काळाबाजार प्रकरणी रात्री अटक करण्यात आली आहे. क्राईस्ट रुग्णालयातील या गैरप्रकारात डॉक्टरला मदत करणाऱ्या दोन  नर्सेसना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

क्राईस्ट रुग्णालयाला शहरातील मुख्य शासकीय कोविड केंद्राएवढेच महत्व आहे. इथली खाटांची आणि उपचाराची क्षमता लक्षात घेता हे केंद्र कोविड उपचारात मोठे योगदान देत आहे. काल अन्न व औषध प्रशासन पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे गांधी चौकातील गजबजलेल्या भागात रेमडेसिवीर विक्रेता आणि खरेदीदार या दोघांना धाड घालून ताब्यात घेतले होते. गुन्हा नोंद करून हा तपास शहर पोलिस ठाण्याला सोपविण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यानंतर पोलीस विभाग तपास करीत क्राईस्ट रुग्णालयापर्यंत पोहचले. तपासाअंती या प्रकरणात एकूण ५ जणांना अटक करण्यात आली आहे. शहर-जिल्ह्यात होत असलेल्या रेमडेसिवीर काळाबाजाराचे हे धक्कादाक वास्तव समोर आले आहे. या ठिकाणी रुग्णालयाला वितरित होणारे इंजेक्शन येथे असलेली टोळी जादा दरात बाहेर विकत असल्याचा खुलासा झाला आहे.

या टोळीने किती इंजेक्शन अशाप्रकारे विकले आहे, याची पोलीस चौकशीत माहिती मिळणार आहे. हे इंजेक्शन रुग्णाच्या नावे वितरित होत आहेत. त्यामुळे पैशाच्या लोभापायी  किती रुग्ण इंजेक्शनविना मरण पावले, याची कल्पना डोकं सुन्न करणारी आहे. रेमडेसिवीर काळाबाजाराची ही साखळी कुठवर जाते, याकडे जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे देखील वाचा : 

…अखेर श्वेता हॉस्पिटल कोविड सेंटरची मान्यता रद्द; कोव्हीड रुग्णांकडून जादा दर आकारणे चांगलेच भोवले

सीडॅकमध्ये प्रोजेक्ट इंजिनीअर्स, असोसिएट्सच्या ४४ जागा

Comments are closed.