Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सरपंच पदावर पुत्र विराजमान करण्यासाठी बापानेच केला शेतकरी संघटनेत वाताहत ,संघटनेच्या नेत्यांनीच केला संघटनेचा घात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गोंडपिपरी दि १५ फेब्रुवारी  :- सार्वत्रिक झालेल्या  ग्रा .प. निवडणुकामध्ये ग्राम पंचायत विट्ठलवाडा येथून एकूण ८  ग्राम पंचायत सदस्य शेतकरी संघटनेकडून निवडुन आले असतानाच विट्ठलवाडा ग्रामपचायतीवर शेतकरी संघटनेची सत्ता बसेल हे  सुनिश्चितच असताना  विट्ठलवाडा येथिल शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते व्यकटेश मलेलवार यांनी जातीय राजकारण करून संघटनेत वाताहत करून आपला मुलगा अंकुश मलेलवार याना सरपंच बनविण्याच्या हेतूने निवडून आलेल्या आठही नवनियुक्त सदस्यांमध्ये फूट पाडून शेतकरी संघटनेत ताटातूट केली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेतून केला आहे. तीन सदस्याने केला आहे .एवढेच नव्हे तर संपवून टाकण्याची भाषा केल्याने पत्रपरिषदेत माहिती देण्यात आली आहे 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

.एवढेच नाही तर आम्ही संघटनेशी गेल्या अनेक वर्ष्यापासून जुडले असताना देखील केवळ पुत्र प्रेमापोटी व सत्तेच्या हवाश्या पोटी संघटनेच्या एकूण आठ ग्रामपंच्यायत सदश्यापैकीं पाच सदस्यांचा वेगळा गट तयार करून तीन सदस्यना डावलले व आपला स्वार्थ साधीत आपल्याच मुलाला सरपंच बनविले.असल्याचा थेट आरोप करण्यात आला आहे . संघटनेतील पदाधिकारी आम्ही कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसतानाही देखील कांग्रेस पक्षात प्रवेश केला म्हणून वृत्तपत्रात नाहक बदनामी करत खोटी बातमी प्रकाशित केली असल्याने  त्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो .


तसेच त्या शेतकरी संघटनेच्या सत्ताधारी गट आणि त्यांचे नेते यांच्या कडून आम्हाला धमक्या दिल्या जात असल्याने आमच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याची माहिती नवनियुक्त शेतकरी संघटनेच्या तीन सदस्यांनी पत्रकार परिषेदेत दिली.
आमच्या सर्वांच्या एकोप्यामुळे विट्ठलवाडा गावात नऊ पैकी आठ सद्स्य निवडून येऊ शकले आहेत ,एकट्या व्यंकटेश मलेलवारांमुळे एवढे मोठे यश शक्य नव्हते ? यदाकदाचित
आमच्या मुळेच एवढे यश मिळाले असे जर संघटनेच्या गावपुढार्यांना वाटत असेल तर त्यांनी राजीनामे देऊन पुन:च्य निवडणूक लढवावी आम्ही निवडणूक लढविण्यास तयार आहोत
मात्र स्वतःच्या स्वार्थसाठी आमची नाहक बदनामी थांबवावी अशी माहिती
पत्रकार परिषदेत सौ.दर्शना एकनाथ दुर्गे , शुभम पिपळकर, शांताराम आलाम यां नवनियुक्त शेतकरी संघटनेच्या तीन सदस्यांनी दिली आहे  .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.