Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, दि. 24 जून : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची व होलार) कुटुंब प्रमुख व्यक्तीचे कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या परिवारातील वारसदारास एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांचेमार्फत रु. 5.00 लाखांपर्यत (रु.4.00 लाख एन.एस.एफ.डी.सी. कर्ज + 1.00 लाख भांडवली अनुदान) व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना प्रस्तावित आहे.

या योजनेची परतफेड 6 वर्षे व व्याजदर 6 टक्के राहील. सदर कर्ज योजनेसाठी मयत व्यक्तीची आवश्यक माहिती पुढील प्रमाणे राहील.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मयत व्यक्तीचे नांव, संपूर्ण पत्ता, आधार क्रमांक, जन्मतारीख, लिंग, जात/पोटजात, मृत्यू दिनांक, रेशनकार्ड, मयत झालेल्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला. कुटुंबातील व्यक्तींची एकूण संख्या, कुटुंबातील प्रमुख वारसदार, कुटुंबातील व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न (रु. 3.00 लाखांच्या आत) कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबातील व्यक्तीने वरील माहिती महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात सादर करावी अथवा महामंडळाच्या ई-मेलवर पाठविण्यात यावी. यासोबत लिंक पाठविण्यात येत आहे-

हे देखील वाचा  :

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चंद्रपूर येथे 28 जून रोजी डाक अदालतीचे आयोजन

वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

नागरिकांना दिलेला शब्द प्राधान्याने पूर्ण करू शकलो याचा मनापासून आनंद – जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार

 

 

Comments are closed.