Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट

नागरिकांनी उचित सतर्कता बाळगावी - जिल्हाधिकारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली, १८जुलै : भारतीय हवामान विभागाच्या प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर द्वारे गडचिरोली जिल्ह्यात पुढील ४८ तासात गडचिरोली जिल्ह्यातील विरळ ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अत्यंत मुसळधार पाऊस तसेच विरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत नागरिकांनी उचित सतर्कता बाळगण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

हवामान विभागाने दि. १८ जुलै, २०२४ करिता ऑरेंज अलर्ट तर दि. १९ जुलै रोजी रेड अलर्ट तसेच दिनांक २० जुलै, २०२४ रोजी ऑरेंज अलर्ट बाबत इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी धातुजन्य वस्तु, विद्युत खांब वा झाडाजवळ राहू नये, झाडाखाली आसरा घेवू नये. मुसळधार अति मुसळधार पाऊसामुळे नदी, नाले, ओढे यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकिना-यावरील गावांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याची दक्षता घ्यावी, तसेच नदी/ नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहत असतांना कोणीही पुल ओलांडू नये.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

तलाव / बंधारा / नदी इत्यादी ठिकाणी नागरिक पर्यटनासाठी जाऊन सेल्फीच्या नादात जीव गमावण्याच्या घटना प्रामुख्याने दिसून येतात. सबब सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, नदी/ तलाव / बंधारे इत्यादी ठिकाणांजवळ उचित सतर्कता बाळगावी. सेल्फीचा मोह करु नये असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे

गडचिरोली पोलिसांच्या कारवाईत १२ माओवादी ठार; मुख्यमंत्र्यांकडून गडचिरोली पोलिसांचे विशेष कौतुक

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.