Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे संत जगनाडे महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, दि. ८ डिसेंबर :- संत संताजी जगनाडे महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मुख्यमंत्री अभिवादन संदेशात म्हणतात, संत जगनाडे महाराज यांनी जगद्गुरु तुकाराम महाराज यांना गुरू मानले. त्यामुळेच तुकोबारायांची गाथा आज आपल्या पर्यंत पोहचली. संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा पाया घातला आणि तुकोबारायांनी कळस रचला असे म्हटले जाते. मराठी साहित्यासाठी तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे अनमोल ठेवा आहे. त्यांचे असे अनेक अभंग संत जगनाडे महाराजांनी लिहून ठेवल्यामुळे मराठी आणखी समृद्ध झाली.त्यांनी स्वत:ही उद्बोधक अशा अनेक रचना लिहिल्या. संत जगनाडे महाराजांचे हे योगदान अपूर्व असेच आहे. संत जगनाडे महाराजांच्या पवित्र स्मृतींना त्रिवार अभिवादन.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Comments are closed.