Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातून 8०० भाविक जाणार अयोध्याला

७ ऑक्टोबरला पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रेल्वेला हिरवी झेंडी

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली : मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातून पहिल्या फेरीत 800 भाविक 7 ऑक्टोबर रोजी अयोध्या करिता रवाना होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वडसा येथे भाविकांच्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखविण्यात येणार आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खासदार नामदेव कीरसान आमदार कृष्णा गजबे व डॉ.देवराव होळी, जिल्हाधिकारी संजय दैंने, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, सहाय्यक आयुक्त डॉ.सचिन मडावी यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

दिनांक 7 तारखेला सदर रेल्वे 11 वाजता वडसा स्टेशन वरून निघेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी वाराणसी येथे पोहचेल. तिथे विश्वनाथ मंदिर दर्शन आणि वाराणसी दर्शन आणि मुक्काम असेल.त्यानंतर 9 तारखेला सकाळी अयोध्या येथे पोहचेल आणि तिथे श्रीराम मंदिरात दर्शन घेणार आणि रात्री परतीचा प्रवास करेल. दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजता वडसा स्टेशन येथे भाविक परत येतील. भाविकांसोबत वैद्यकीय चमू आणि समाज कल्याण विभागाचे कर्मचारी राहणार असल्याचे समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी कळविले आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Leave A Reply

Your email address will not be published.