Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतली विविध शिष्ट मंडळांची भेट

0

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गोंदिया: राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी गोंदिया येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विविध क्षेत्रातील शिष्टमंडळांची भेट घेतली व त्यांची विविध विषयांवरील मते जाणून घेतली. यामध्ये राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, क्रीडा, कला, सामाजिक, आदिवासी, कृषी, औद्योगिक आदी क्षेत्रातील प्रतिनिधींची भेट घेवून जिल्ह्यातील विविध प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.

आदिवासी क्षेत्रामध्ये उद्योग वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यत जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचला पाहिजे यासाठी राज्यपाल यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. गोंदिया जिल्ह्यामध्ये भाताची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येते, परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे भात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भात क्षेत्रामध्ये अत्याधुनिक कृषी क्षेत्राचा वापर करण्यात यावा तसेच जिल्ह्यामध्ये ड्रॅगनफुट लागवड, राईस इंडस्ट्रीज यांच्या समस्या जाणून घेवून त्याचा पाठपुरावा करण्याबरोबरच जिल्ह्यातील सर्व उद्योग आणि व्यावसायिकांनी सोलार एनर्जीचा वापर करून सोलार सारख्या महत्त्वाच्या विषयाला प्रोत्साहन देण्याची गरज राज्यपालांनी व्यक्त केली.

जिल्ह्यात क्रीडा संस्कृती जिल्ह्यामध्ये रूजविण्यासाठी खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त करून बास्केटबॉल, टेनिस सारख्या खेळाची साधने उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाने प्रयत्न करावे, असे राज्यपालांनी यावेळी संबंधित विभागाला सुचना दिल्या.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.