Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाला ‘फिक्की’ चा नामांकित ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व’ राष्ट्रीय पुरस्कार

दिल्लीतील कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली : ‘फिक्की’ अर्थात ‘फेडरेशन ऑफ इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री’ या राष्ट्रीय संस्थेकडून गोंडवाना विद्यापीठाला ‘संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व’ हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. आज दिल्ली येथे पार पडलेल्या 19 व्या ‘फिक्की हायर एज्युकेशन समिट 2024’ या कार्यक्रमात भारतातील ब्रिटिश सरकारच्या उच्चयुक्त श्रीमती लिंडा कॅमरून यांच्या हस्ते गोंडवाना विद्यापीठाला हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यानिमित्ताने नेहमीच नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवल्या गेला आहे.

‘फिक्की’या संस्थेने संस्थात्मक सामाजिक उत्तरदायित्व या प्रवर्गातून पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव मागितले होते. गोंडवाना विद्यापीठाने सुरु केलेल्या एकल ग्रामसभा सक्षमीकरण कार्यक्रमाचा या पुरस्कारासाठी ऑनलाईन प्रस्ताव सादर केला होता. या संस्थेने भारतातील सहा विद्यापीठांना सादरीकरण करण्यासाठी बोलाविले, त्यानंतर तीन विद्यापीठांचे नामांकन या पुरस्काराकरिता करण्यात आले. गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गोंडवाना विद्यापीठ राबवित असलेल्या ‘गाव तिथे विद्यापीठ’, ‘सीआयआयआयटी’, ‘एसटीआरसी’, या नाविन्यपूर्ण आणि सामाजिक उपक्रमांचाही ‘फिक्की’ने यानिमित्ताने दखल घेत गौरव केला.
गोंडवाना विद्यापीठाने ग्रामसभा सक्षमीकरणासाठी पेसा कायदा, सामूहिक वन हक्क कायदा, जैव विविधता कायदा, वन व्यवस्थापन व संरक्षण, गौण वन उपजव रेकार्ड व अंकेक्षण यांचे प्रशिक्षण देऊन ग्रामसभाना आतापर्यंत 235 वन व्यवस्थापन आराखडे तयार करण्याकरिता तांत्रिक मदत केली आहे. विद्यापीठाच्या वतीने एकल ग्रामसभा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेश मडावी व डॉ. मनीष उत्तरवार संचालक, ‘ननावसा’ यांनी दिल्ली येथे झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार स्वीकारला.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.