Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

व्हाॅॅट्सएपने प्रत्येक वापरकर्त्याला त्यांचा डेटा सुरक्षित असल्याची खात्री पटवून देण्यासाठी व्हाॅॅट्सएप स्टेटसला केले फोटो शेअर….

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवासंपासून व्हाॅॅट्सएप त्याच्या नव्या प्रायव्हसी पॉलिसीमुळे चर्चेत आहे. अशातच WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. व्हाॅॅट्सएपच्या या नव्या व्हायव्हसी पॉलिसीवर युजर्सकडून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. त्यानंतर व्हाॅॅट्सएपनं हे पाऊल उचलंलं आहे.

WhatsAppकडून स्टेटसवर शेअर करण्यात आलेल्या पहिल्या फोटोमध्ये ‘आम्हाला काळजी आहे तुमच्या गोपनीयतेची’, असं म्हटलं आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दुसऱ्या फोटोमध्ये ‘जर end to end encrypted वर असलेलं तुमचं खाजगी चॅट WhatsApp वाचू किंवा ऐकू शकत नाही.’, असं सांगितलं आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

तिसऱ्या फोटोमध्ये ‘WhatsApp तुम्ही शेअर केलेल लाईव्ह लोकेशन पाहू शकत नाही.’ असं म्हटलं आहे.

तसेच चौथ्या फोटोमध्ये ‘व्हॉट्सअॅप तुमचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकसोबत शेअर करत नाही.’, असं म्हटलं आहे.

युझर्सच्या याच नाराजीनंतर WhatsAppनं एक पाऊल मागे घेत, गोपनीयता धोरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर व्हॉट्सअॅपनं हे चार फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसला शेअर केले आहेत. तसेच WhatsApp कडून देण्यात आलेल्या अधिकृत माहितीनुसार, ‘8 फेब्रुवारीला कोणालाही व्हॉट्सअॅप अकाऊंट सस्पेंड अथवा डिलीट करावं लागणार नाही. या अॅपवर गोपनीयता आणि सुरक्षितता धोरण कशा प्रकारे काम करतं यासाठी आम्ही काही पावलं उचलत आहोत. 15 मे रोजी नवा अपडेट पर्याय उपलब्ध होण्यापूर्वी आम्ही या धोरणाबाबतचे संभ्रम दूर करु’, असं म्हटलं गेलं आहे.

WhatsApp या सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अॅपनं मागील काही दिवसांपासून नवं गोपनीयता धोरण लागू करण्यासाठीची पावलं उचलण्यास सुरुवात केली होती. यासाठी युझर्सना हे धोरण स्वीकारण्यासाठीचं आवाहनही करण्यात आलं. तसा मेसेजही अनेकांपर्यंत पोहोचला. WhatsAppचं हे नवं धोरण न स्वीकारणाऱ्यांचं अकाऊंट बंद होणार असल्याची बाबही स्ष्ट करण्यात आलं होतं. पण आता या धोरणास व्हॉट्सअॅपकडून स्थगिती देण्यात आली असल्यामुळे आता युजर्सना दिलासा मिळाला आहे.

Comments are closed.