Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सोने-चांदी दरात घसरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली, 15 फेब्रुवारी :- कोरोनाच्या संकटकाळात सोन्याच्या दरानं आभाळ गाठलं होतं. परंतु ऑगस्ट 2020 मध्ये सरकारने ढिल दिल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट होताना पाहायला मिळत आहे. कोरोनाची लस आणि कोरोनाच्या लसीकरणामुळे बाजारात उलथापालथ सुरू झाली आहे. यामुळे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट होत आहे. सोन्याच्या किमती वाढल्यामुळे नागरिकांचा इतर गुंतवणुकीचा देखील ओढा वाढला होता. दरम्यान ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, त्यामुळे या सर्वोच्च स्तरावरुन सोन्याचे दर 10,000 रुपयांनी कमी झाले आहेत. याचबरोबर चांदीच्या दरात देखील मागील काही महिन्यांपासून 10,000 रुपयांची घसरण झाली आहे.

gold and silver rate

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचांदीचे दर कमी झाले आहेत. ‘गुड रिटर्न्स’च्या अहवालानुसार सोन्याचे दर 457 रुपयांनी कमी होऊन 46,390 रुपये प्रति तोळा झाले आहेत. तर चांदीचे दर 347 रुपयांनी कमी होऊन 67,894 रुपये प्रति किलो झाले आहेत. आधीच्या सत्रामध्ये मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदीची किंमत 68,241 रुपये प्रति किलो होती. तर सोन्याचे दर 661 रुपयांनी कमी होऊन 46,847 रुपये प्रति तोळा होते.

ऑगस्ट महिन्यात सोन्याचे दर 56,200 च्या स्तरावर पोहोचले होते, तर चांदीने देखील 77,840 प्रतिकिलो इतका भाव गाठला होता. परंतु आतापर्यंत सोन्याच्या भावात 9,810 रुपये प्रतितोळा, तर चांदीच्या भावात प्रतिकिलो 9,946 रुपयांची घसरण झाली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.