Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

देश-विदेशात शिक्षणाच्या उत्तम संधी;ॲड.दीपक चटप

चेव्हनिंग स्कॉलर तथा चेव्हनिंग गोल्डमॅन पुरस्कृत ॲड.दीपक चटप यांचे प्रतीपादन ..

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली दि, ७ : दिवसेंदिवस स्पर्धा गतिमान होत आहे. अशा जीवघेण्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थी हा सर्वांगीणदृष्ट्या परिपूर्ण असण्यासाठी विविध क्षेत्रातील माहिती व ज्ञान असणे अभिप्रेत आहे. सद्या शिक्षण क्षेत्रातील विविध आव्हाने अन् एकंदरीत संभ्रमित करणारे वातावरण असल्यामुळे विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणापासून कात टाकून देश -विदेशात असलेल्या विविध शिक्षणाच्या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जागतिक ब्रिटिश सरकारची चेव्हनिंग स्कॉलर तथा चेव्हनिंग गोल्डमॅन पुरस्कृत ॲड.दीपक चटप यांनी केले. ते वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचलित गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल, कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालय आष्टी येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित शिक्षण यात्रेच्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य शैलेंद्र खराती होते .यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय फुलझेले , युवा कवी शिक्षण यात्रेचे संवादक अविनाश पोईनकर,डॉ.रवी शास्त्रकार , डॉ.भारत पांडे , डॉ.गणेश खुणे, डॉ.श्याम कोरडे, प्रा.रवी गजभिये,ॲड.प्रतीक पानघाटे, इतिहास मेश्राम, मानस , प्रा.ज्योती बोबाटे, प्रा.टिकले, प्रा.राठोड,प्रा उंदीरवाडे, प्रा.मल्लेलवार, श्री.पिसे, कु.मुप्पावार उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली जिल्ह्यात शिक्षण यात्रेचे स्वागत .

ॲड . दीपक चटप यांनी आष्टी येथील मुख्य चौकातील भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण व अभिवादन करुन शिक्षण यात्रा जनजागृती रॅली महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात पोहचली. डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात डॉ.आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीपप्रज्वलाने अभिवादन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कार्यक्रमात पुढे बोलताना ॲड.दीपक चटप यांनी दहावी, बारावी व पदवीनंतर देश विदेशात असलेल्या शिक्षणाच्या विविध संधी विषयीची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांकरीता विलक्षण करिअरच्या उत्तम संधी देश विदेशात उपलब्ध असल्यामुळे त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेण्याविषयी प्रोत्साहित केले. तद्वतच  आय आय टी, एमपीएससी, यूपीएससी परीक्षा ,Feu ,Net,अभ्यासक्रम अशा विविध  संधीचा पाठलाग धेय्यवेडे होऊन करावा लागेल.चेव्हनिंग, कॉमनवेल्थ,टिच फॉर, गांधी फेलोशिप या विविध फेलोशिप करिता आवश्यक पात्रता आणि त्यामुळे मिळणारे विलक्षण ज्ञान व करियरच्या संधी याविषयीची ही मार्गदर्शन केले. आपण वंचित ,उपेक्षित, मागास भागात आहोत हा न्यूनगंड न बाळगता आपल्यामध्ये प्रचंड क्षमता आहे.प्रचंड प्रतिभा मुलांमधे आहे. मरगळ झटकून टाकुन मार्गक्रमण करा असा सल्लाही त्यांनी दिला.

शिक्षण यात्रेचे संवादक युवा कवी ,मुक्त पत्रकार, मुख्यमंत्री फेलो अविनाश पोइनकर यांनी शिक्षण यात्रेचा उद्देश, उद्दिष्टे आणि भविष्यातील योजनाविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी यानंतर पुढें होणाऱ्या निवासी शिबिरात सहभागी होऊन देश- विदेशातील करिअरच्या वेगवेगळ्या क्षेत्रात लौकिक मिळविण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन प्रा. डॉ.राजकुमार मुसने केले. ब्रिटिश सरकारने चेव्हनिंग गोल्डमन पुरस्काराने सन्मानित केल्याबदल महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या वतीने प्राचार्य डॉ.संजय फुलझेले यांच्या हस्ते ॲड.दीपक चटप यांचा व शिक्षण यात्रेचे संवादक अविनाश पोईनकर यांचा शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाला महात्मा ज्योतिबा फुले हायस्कूल कनिष्ठ तथा वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घेतला.शिक्षण यात्रा जनजागृती रॅलीकरिता राष्ट्रीय सेवा योजनेच्या सवयंसेवकांनी पुढाकर घेतला.

हे देखील वाचा,

सार्वजनिक बांधकाम विभागाचा 30 ते 68 % बिलोचा घोळ येणार बाहेर; विजय खरवडे

अंधत्वावार मात करत “त्याने” गाठलं यशाचं शिखर…

आदिवासी आश्रम शाळा जानाळा येथील विद्यार्थ्यांची इस्रो सहलीसाठी निवड

Comments are closed.