Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सार्वजनिक बांधकाम विभागाचा 30 ते 68 % बिलोचा घोळ येणार बाहेर; विजय खरवडे

जिल्हाभरातील कामाची होणार चौकशी.... बांधकाम सचिवानी व मख्य अभियंत्यानी दिले चौकशीचे आदेश.... दोषी अभियंते व कंञाटदावर होणार कारवाई...

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

ओमप्रकाश चुनारकर,

 तिन वर्षातील झालेले कामे तसेच सध्यास्थित सुरु असलेल्या कामावरील फलकाच्या फोटो मुख्यअभियंता नागपुर यांनी मागीतले व फलक न लावणा-या कंञाटदार,अभियंता यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सन 2020 ते 23 पर्यंतच्या 30 ते 68 %बिलो नुसार झालेल्या व सुरु असलेल्या एकुण रस्ते,डांबरींग व अन्य कामांची उच्च स्तरीय चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी करावी या करीता भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी मुंबई मंञालयात लिखीत तक्रार निवेदन सादर केले आहे ………………………………………………………………………………………………………………………….

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गडचिरोली दि, 07 : जिल्हातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कंञाटदारा मार्फत करण्यात येणारी रस्ते,डांबरींग,व अन्य कामे मंजुर कामे वाटेल त्या प्रकारे 30 ते 68 % पर्यंतचे बिलो देऊन काही कंञाटदार संबधीत अभियंत्याचे सगनमताने कामे करीत आहेत.ज्यामुळे जिल्हाभरातील प्रामाणीक कंञाटदारावर अन्याय होत आहे.

जिल्हात जर का किमान 30 % पर्यंत बिलोनुसार कामे झाल्यास अनेक कंञाटदाराना कंत्राटी पध्दतीने कामे करता येणार.परंतु जिल्हात निवडक कंञाटदार व संबधित अभियंत्याच्या सगनमताने मनमर्जीपणाचे कामे सुरु असुन उपविभाग चामोर्शी,गडचिरोली,अहेरी,एटापल्ली येथील 30 ते 68 % पर्यंत कंञाटदारानी बिलो देऊन अनेक कामे केलेली आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

30 ते 68 % बिलोची कामे करताना परफार्मन्स रक्कम भरायची असते, ती नियमानुसार अनेकानी भरलेली नाही.सदर कामे अंदाजपञकानुसार करण्यात आलेले नसुन अत्यंत निक्रुष्ट दर्जाचे बोगस व खराब कामे झालेली आहेत.तसेच प्रत्येक कामा वरील बिलो शासनाकडे जमा करायचा असतो.परंतु त्यातील अनेक कामाचा बिलो वाढीव कामे पँचेस दाखवुन खर्च केल्याचे दाखवितात.व 30 % वरील बिलोच्या प्रत्येक कामांची मुख्य अभियंता नागपुर यांचे कडुन मंजुरी घ्यायची असते परंतु मुख्यअभियंता  कडुन अनेक कामांची मंजुरी घेतलेली नाही.

जर का 30 ते 68 % बिलो देऊन कंञाटदार कामे करीत असतील तर खरोखर किती खराब कामे झालेले असतील याकडे जिल्ह्यातील आजी,माजी लोकप्रतिनिधी हेतुपुरस्पर सदर कामाकडे दुर्लक्ष करुन कंञाटदार व अभियंते यांना  साथ देतात. त्यामुळे जनता अन्यायाचा सामना करीत आहे. व काही कामे कागदोपञी दाखविल्या गेल्याची लोकचर्चा आहे. तसेच प्रत्येक बांधकामावर कामाचे ठिकाण, कामाची किमंत ,कामाचा कलावधी,देखभाल दुरुस्तीचे कालावधी अश्या स्वरुपाचे कामाचे फलक लावणे बंधनकारक आहे परंतु अनेक कामावर फलक लावलेले नाही.

जिल्हाभरातील तिन वर्षातील झालेल्या व सुरु असलेल्या प्रत्येक कामावरील फलकाच्या फोटो मुख्यअभियंता नागपुर यांनी मागीतले व फलक न लावणा-या कंञाटदार,अभियंता यांचेवर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे त्यांनी आश्वासन दिले. तेव्हा जिल्हाभरातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत सन 2020 ते सन 2021/22/23 पर्यंतच्या 30 ते 68 % बिलो नुसार झालेल्या व सुरु असलेल्या एकुण रस्ते,डांबरींग व अन्य कामांची उच्च स्तरीय चौकशी समिती मार्फत सखोल चौकशी करावी या करीता भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी मुंबई मंञालयात मुख्यमंञी,उपमुख्यमंञी,बांधकाममंञी,सचिव बांधकाम यांना चौकशी करीता दोनदा लिखीत निवेदन सादर केले .त्या नुसार मंंञालयातील सचिव रस्ते यांनी मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नागपुर यांना 30 % वरील एकुण बिलोच्या कामाचे लिखीत चौकशीचे आदेश दिले. व मुख्य अभियंता नागपुर यांनी दक्षता व गुण नियंञण विभागास प्रत्येक कामावरील साहीत्याचा दर्जा तपासुन कार्यवाहीचे आदेश दिलेले आहेत.तसेच दुस-या जिल्हातील अधिकारी यांना मोका चौकशीचे आदेश देणार असल्याचे आमच्या प्रत्यक्ष भेटीत सांगीतले व चौकशीचे आदेश दिलेले असुन येत्या महीनाभरात अनेक दोषी अभियंते व कंञादार यांचे वरती कायदेशी कारवाई होणार व सबंधित कामांची पंचाच्या समक्ष मोकाचौकशी होणार असल्याचे भारतीय जनसंसदेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगीतले.

चौकशीची सुरुवात चामोर्शी व गडचिरोली उपविभागातुन करण्यासंदर्भात मागऩी केलेली आहे.तसेच चौकशी करीता विलंब करण्याचा प्रयत्न झाल्यास येत्या पंधरा दिवसात लोकशाहीच्या मार्गाने तिव्र आंदोलन करणार असल्याचे संकेत दिले आहे.

हे देखील वाचा

जागतिक धम्मगुरु दलाई लामा यांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली भेट

‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणारे पहिले प्रज्ञानंद- वैशाली बहिण -भाऊ

अंधत्वावार मात करत “त्याने” गाठलं यशाचं शिखर…

Comments are closed.