Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

‘ग्रँडमास्टर’ किताब मिळवणारे पहिले प्रज्ञानंद- वैशाली बहिण -भाऊ

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

बहीण-भावाच्या या जोडीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी कांस्य, आशियाई खेळात दुहेरी रौप्य जिंकले आहे. १८ वर्षीय प्रज्ञानंदने १२ व्या वर्षी, तर वैशालीने २२ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब जिंकला. बहीण-भावाच्या या जोडीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी कांस्य, आशियाई खेळात दुहेरी रौप्य जिंकले आहे.

एललोब्रेगेट, स्पेन, दि. ४ : ‘ग्रँडमास्टर’ आर. प्रज्ञानंद व त्याची बहीण वैशाली रमेशबाबी यांनी अनोखा इतिहास निर्माण केला आहे. वैशाली स्पेन मध्ये एललोब्रेगेट ओपन दरमान २५०० रेटिंग ओलांडून भारताची तिसरा महिला ग्रँडमास्टर ठरली. या कामगिरीबरोबरच वैशाली व तिचा धाकटा भाऊ प्रज्ञानंद इतिहासात जगातील पहिलीच ग्रँडमास्टरची भावा-बहिणीची जोडी म्हणून नोंदवले गेले आहेत. सोबतच या भाऊ-बहिणीने मिळून कॅडेट्सदेखील बनले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या आधी भारताच्या कोनेरू हम्पी व हारिका द्रोणावली महिला ग्रँडमास्टर राहिलेल्या आहेत. या गौरवामुळे खूप आनंदी आहे. वैशाली म्हणाली बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती तेव्हा ग्रँडमास्टरचे स्वप्न पाहत आले आहे. आता ते पूर्ण झाले आहे. सध्या माझे एललोब्रेगेट ओपन टुर्नामेंट जिंकण्याचे उद्दिष्ट आहे. १८ वर्षीय प्रज्ञानंदने १२ व्या वर्षी, तर वैशालीने २२ व्या वर्षी ग्रँडमास्टरचा किताब जिंकला. बहीण-भावाच्या या जोडीने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये दुहेरी कांस्य, आशियाई खेळात दुहेरी रौप्य जिंकले आहे.

प्रज्ञानंदची मोठी बहीण वैशालीनेदेखील लहान वयापासूनच बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली होती. घरात बहीण वैशालीला पाहून प्रज्ञानंदला देखील बुद्धिबळाची आवड वाढली. वैशालीनेदेखील धाकट्या भावाला त्यातील बारकावे शिकवले. प्रज्ञानंद व वैशालीचे वडील रमेशबाबू पोलिओग्रस्त आहेत आणि बँकेत नोकरीला आहेत. आई नागालक्ष्मी प्रत्येक स्पर्धेत प्रज्ञानंद व वैशालीसोबत जातात.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

भावंडाच्या या यशाबद्दल प्रशिक्षक रमेश म्हणाले, भाऊ-बहीण दररोज ८ तास सराव करतात. प्रज्ञानंदच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील कौतुक केले होते. ग्रँडमास्टरपर्यंतचा त्याचा प्रवास सर्वांसाठी थक्क करणारा प्रेरणा देणारा आहे.

Comments are closed.