मकर संक्रातीला स्वस्त झालं सोनंचांदी
सोन्याच्या किंमती 435.00 रुपयांनी कमी
चांदीचे भावही 300 रुपयांनी घसरले आहेत.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
मुंबई डेस्क 14 जानेवारी:– आज मकरसंक्रांत सण आहे, त्यामुळे जर तुम्ही आजच्या दिवशी तुम्ही सोनं-चांदी खरेदी करायचा विचार करत असाल तर सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात पुन्हा घसरण झालीय. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर 14 जानेवारी 2021 रोजी सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. वायदे बाजारात सोन्याच्या किंमती 435.00 रुपयांनी कमी झाल्या आहेत. या घसरणीनंतर फेब्रुवारीच्या डिलिव्हरीच्या सोन्याचे दर 48,870 रुपये प्रति तोळा झाले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आज घसरण झाली आहे. अमेरिकेत सोन्याच्या किंमतीत 9.43 डॉलरने घसरण झाली आहे. यानंतर सोन्याचे दर 1,838.56 डॉलर प्रति औंस वर ट्रेड करत होते.
चांदीच्या फ्यूचर ट्रेडिंगमध्ये 766 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर चांदीचे भाव 65,255 रुपये प्रति किलो झाले आहेत. तपासा काय आहेत महानगरांमध्ये सोन्याचे दर.आंतरराष्ट्रीय बाजारातयाशिवाय चांदीमध्ये 0.15 डॉलरची घसरण झाल्यानंतर दर 25.20 डॉलर या स्तरावर आहेत.
प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या या दर – मुंबई – 4945, दिल्ली- 52750, कोलकाता – 51690, चेन्नई – 50880
चांदीचे भाव (प्रति किलो)– मुंबई – 66000, दिल्ली – 66000, चेन्नई – 70300, कोलकाता – 66000.
Comments are closed.