सोने-चांदी दरात वाढ
2 महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहचल्या किंमती.
सोमवारी एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी हे दर 50,860 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली डेस्क, 4 जानेवारी :- सोने आणि चांदीचे भाव ग्लोबल मार्केट्समध्ये 2 महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहचले आहेत. याचा परिणाम भारतीय बाजारातही पाहायला मिळतो आहे. भारतातही सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारीमध्ये डिलिव्हरी होणारं सोनं वायदा बाजारात आज 1.23 टक्के म्हणजेच 600 रुपयांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 50,826 रुपयांवर पोहचलं आहे. तर मार्चमध्ये डिलिव्हरी होणारी चांदी वायदा बाजारात 2.10 टक्के अर्थात 1430 रुपयांच्या वाढीसह 69,552 रुपये प्रति किलोग्रॅमवर ट्रेड करत आहे.
सोमवारी एमसीएक्स मध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1.23 टक्क्यांनी वाढ झाली. परिणामी हे दर 50,860 रुपये प्रति दहा ग्रामवर पोहोचले. तर, चांदीचे दर 2.21 टक्क्यांनी वाढल्यामुळं 1,504 रुपयांनी ही वाढ होत दर 69,627 रुपये प्रति दहा ग्राम वर पोहोचले. डॉलर इंडेक्स कमी असल्या कारणानं गुंतवणुकदारांनी याचा फायदा घेत सोन्यातील गुंतवणूक वाढवली. ज्यामुळं सोन्याची मागणी वाढत त्याच्या दरांमध्ये तेजी पाहायला मिळाली.
वायदा बाजारातील सोन्यासह देशात आज Spot Gold च्या किंमतीतही वाढ झाली आहे. भारतात आज Spot Gold प्रति 10 ग्रॅम 50,070 रुपयांच्या दराने ट्रेड करत आहे. दिल्लीत शुक्रवारी सोन्याच्या दरांत 20 रुपयांची वाढ झाली. ज्यामुळं हे दर 49,687 वर पोहोचले. प्रति दहा ग्रामसाठी हे दर पाहायला मिळाले. तर, चांदीचे दर 404 रुपयांनी वाढले. जे पाहता प्रति किलो चांदिसाठी 67,520 दर मोजावा लागला.
Comments are closed.