Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कंत्राटी शेतीशी आमचा संबंध नाही-रिलायन्स

कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट शेतीत हस्तक्षेप करण्याबाबत आमचा कोणताही विचार नसल्याचं म्हणत आपली भूमिका रिलायन्सने स्पष्ट केली आहे.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई, 4 जानेवारी: केंद्र सरकारच्या कृषी सुधारणा कायद्याच्या विरोधात सध्या शेतकऱ्यांचं दिल्लीसह उत्तर भारतामध्ये आंदोलन सुरूआहे. या आंदोलनादरम्यान रिलायन्स रिटेलनं आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कॉर्पोरेट शेती किंवा कंत्राटी शेतीशी आमचा काही संबंध नाही. कॉर्पोरेट किंवा कॉन्ट्रॅक्ट शेतीत हस्तक्षेप करण्याबाबत आमचा कोणताही विचार नसल्याचं म्हणत आपली भूमिका रिलायन्सने स्पष्ट केली आहे. कंपनीने याबाबत एक निवेदन जारी केलं आहे. या निवदेनात कंपनीने असेही म्हटले आहे की ती शेतीची जमीन खरेदी करणार नाही.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

रिलायन्सने सोमवारी एक निवेदन जारी करून हे स्पष्ट केले आहे की ते शेतकर्‍यांकडून थेट धान्य खरेदी करत नाही. पुरवठादार किंवा MSPच्या दराने ते शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करतात किंवा असे पुरवठादार जे शेतकऱ्यांकडून MSP ने धान्य खरेदी करतात अशाच पुरवठादारांकडून कंपनी धान्य खरेदी करते. कंपनीने म्हटले आहे की कमी किंमतीत दीर्घकालीन खरेदी कराराचा कंपनीने कोणताही करार शेतकऱ्यांसोबत केलेला नाही.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.