Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

म्हशींना इंजेक्शन देऊन दूध काढणाऱ्या ६ दूध उत्पादकांना अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

पुणे 16 नोव्हेंबर :- पुणे जिल्ह्यातील सहा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या म्हशींची दूध उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी बंदी घातलेल्या ऑक्सिटोसिन इंजेक्शन्सचा वापर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. याआधी ५ नोव्हेंबर रोजी पुणे शहरातील लोहेगाव परिसरात बेकायदेशीर ऑक्सिटोसिन बॉटलिंग प्लांट चालवल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५ जणांना अटक केली होती.

ऑक्सिटोसिन, शेड्यूल एच या औषधाच्या विक्रीवर केंद्र सरकारने 2018 पासून बंदी घातली आहे. हे इंजेक्शन ज्या प्राण्याला दिले जाते, त्या प्राण्यांपेक्षाही त्यांचे दूध किनाऱ्यांवर या औषधाचे गंभीर घातक परिणाम होतात असे निरीक्षणातून समोर आले आहे. परंतु काही दुग्ध उत्पादक व्यावसायिक छुप्या पद्धतीने या इंजेक्शनचा वापर करून करत असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पुण्यातल्या पिंपळे सौदागर येथील विठ्ठल भिवाजी झिंजुर्णे (४८) आळंदी रोड मोशी येथील सागर कैलास सस्ते(३५), मारुंजी येथील विलास महादेव मुरकुटे (५७); टिंगरेनगर येथील सुनील खंडप्पा मलकुनायक (५१); गुलटेकडी येथील गणेश शंकर पैलवान (५०); आणि आळंदी रोड येथील महादू नामदेव परांडे (५१) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या सर्व आरोपीं विरोधात भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम 328 (विषाद्वारे दुखापत करणे), 420 (फसवणूक करणे आणि अप्रामाणिकपणे मालमत्तेचे वितरण करणे), 175 (लोकसेवकाला कागदपत्र सादर करणे वगळणे), 272 (विक्रीच्या उद्देशाने अन्न किंवा पेयामध्ये भेसळ) आणि 274 ( औषधांमध्ये भेसळ) कलमान्वये विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबूभाई उर्फ ​​अलादीन लस्कर या कल्याण येथील आरोपीला अटक केल्यानंतर पाच दिवसांनंतर गुन्हे शाखा युनिट 1 च्या पथकाने सहा दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या म्हशींचे दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन इंजेक्शन वापरल्याप्रकरणी अटक केली. युनिट 1 च्या पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील आणखी एक आरोपी, समीर अन्वर कुरेशी, जो विमानतळ परिसरात ऑक्सिटोसिन बॉटलिंग प्लांट चालवतो, त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांना समजले की त्याने अनेक दुग्ध उत्पादकांना ऑक्सिटोसिन विकले होते आणि ते हे शेतकरी रोज वापरत होते. या माहितीवर कारवाई करत पोलिसांच्या पथकाने या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांची ओळख पटवली आणि खात्री केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी सांगितले की त्यांनी अशा आणखी शेतकर्‍यांची ओळख पटवली असून त्यांच्यावर देखील लवकरच कारवाई केली जाईल. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिली. गायकवाड पुढे म्हणाले की, अटक करण्यात आलेले आरोपी त्यांच्या म्हशींना रोज ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देत होते. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, अशा औषधांचा केवळ प्राण्यांवरच परिणाम होत नाही, तर या प्राण्यांचे दूध खाणाऱ्या माणसांवरही परिणाम होतो.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

FDA पुणेचे सहाय्यक आयुक्त दिनेश खिवसरा यांनी सांगितले की, डेअरी मालक जास्तीचे दूध त्वरित मिळवण्यासाठी गुरांना ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन देतात. गुरांना दर्जेदार चारा देण्याऐवजी, जनावरांना त्यांच्या कासेतून दूध लवकर बाहेर पडण्यासाठी ऑक्सिटोसिनचे इंजेक्शन दिले जाते, ही एक बेकायदेशीर प्रथा आहे. शिवाय, असे इंजेक्शन देऊन काढलेले दूध मानवांसाठी देखील हानिकारक आहे. पशु कल्याण मंडळाच्या मते, गुरांना टोचलेल्या ऑक्सिटोसिनचा बराचसा भाग त्यांच्या दुधात शिरू शकतो, ज्याच्या प्रभावांना मुले सर्वात जास्त संवेदनशील असतात. ऑक्सिटोसिन मुळे श्रवण आणि दृष्टी दोन्ही खराब होण्याची शक्यता जास्त असते तसेच यामुळे मानवाच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊन त्याला थकवा येतो.

हे पण वाचा :-

Comments are closed.