Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपुरे सराव करताना तरुणाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

वसई, 16 नोव्हेंबर :- वसईत एक हृदयद्रावक घटना घडली आहे. पोलीस भरतीसाठी सराव करताना एका २२ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना वसईत घडली आहे. प्रतीक मेहेर असे या तरुणाचे नाव असून तो मूळचा अर्नाळा किल्ल्यातील रहिवासी होता. सध्या तो रानगाव येथे राहात होता. खडतर सराव करून पोलीस होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या प्रतीकवर काळाने झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. राज्यात लवकरच पोलीस शिपाई पदाची भरती होणार असून ९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधी ऑनलाईन अर्ज भरण्याची तारीख आहे. या सर्वात मोठ्या भरती प्रक्रियेत यशस्वी व्हावे यासाठी राज्यातील लाखो तरुण भरतीपूर्व सराव करत आहेत. असाच सराव वसईच्या रानगाव परिसरात प्रतीक करत होता. सोमवारी संध्याकाळी पाचच्या दरम्यान धावत असताना अचानक त्याच्या छातीत दुखायला लागले.

काही वेळात त्याला हृदयविकाराचा झटका येऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस दलात भरती होण्यापूर्वीच वसईतील तरुणाचे स्वप्न भंगल्याने वसई, विरार, नालासोपारा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रतीक मेहेर प्रमाणेच सराव करणाऱ्या राज्यातील तरुणांनी जिथे शक्य असेल तिथे राज्यस्तरीय तसेच ऍथलेटिक्सशी संबंधित असलेल्या खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली सराव करावा. धावत असताना किंवा वॉर्मअप दरम्यान थांबावे आणि बसूनच पाणी प्यावे. छातीत कळ आल्यावर थोडी विश्रांती घ्यावी, असे आवाहन अर्नाळा येथील पोलीस कॉन्स्टेबल निनाद पाटील यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी महागला

Comments are closed.