Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दक्षिण मुंबईतील २५ कोटींची मालमत्ता बळकावल्याचा आरोप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई 29 नोव्हेंबर :- दक्षिण मुंबईतील उमरखाडी येथील २५ कोटी रुपये किंमतीची इमारत बळकवल्याच्या आरोपाखाली कुख्यात गुंड छोटा शकीलच्या साडूसह खंडणी विरोधी पथकाने काल पाच जणांना अटक केली. मोहम्मद सलीम इकबाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट (४९), मुस्लीम असगरअली अमरेटवाला (६२), शेरझादा जंगरेज खान (६३), अस्लम अब्दुल रेहमान पटनी (५६) व रिजवान अलाउद्दीन शेख (३५) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार हे दक्षिण आफ्रिकेत राहत असून ते सनदी लेखापाल आहेत.त्यांच्या वडिलांच्या मालकीची लम्बात बिल्डींग, उमरखाडी रोड, सर्वे नं. ३६४६, बाबुला टँक रोड, मुंबई-९ या ठिकाणी स्थावर मालमत्ता आहे.या मालमत्तेची २५ कोटी रुपये किंमत आहे.या मालकाचे २००६ मध्ये निधन झाले. यानंतर अटक आरोपी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी २०११ ते २०२१च्या दरम्यान या कट – कारस्थान रचून तक्रारदारांची फसवणुक करण्याच्या उद्देशाने बनावट कागदपत्रे बनवली. ही बनावट कागदपत्रे खरी असल्याचे भासवून ती सह दुय्यम निबंधक, मुंबई शहर क्र. ३ यांच्या कार्यालयात सादर करण्यात आली.

त्यानंतर ही इमारत सलीम फ्रुटची पत्नी शाझीया हिच्या नावावर करण्यात आली. दरम्यान वडिलांची स्थावर मालमत्ता आरोपींनी बळकवल्याचे लक्षात येताच तक्रारदार यांनी २२ सप्टेंबर रोजी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार नोंदवली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी या प्रकरणाची दखल घेऊन पोलीस सह आयुक्त (गुन्हे)सुहास वारके व पोलीस उपायुक्त (प्रकटीकरण) प्रशांत कदम यांना तसे आदेश दिले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाने तपास करून मुस्लीम असगरअली अमरेटवाला , शेरझादा जंगरेज खान, अस्लम अब्दुल रेहमान पटनी व रिजवान अलाउद्दीन शेख यांना अटक केली.तर मोहम्मद सलीम इकबाल कुरेशी ऊर्फ सलीम फ्रुट याला तळोजा मध्यवर्ती कारागृहातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता,त्यांना ३० नोव्हेंबर पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक करीत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.