Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

यशस्वी होण्यासाठी जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यकता विनोद कुमार यांचे प्रतिपादन

युनायटेड नेशन्स (UNO ) ऑर्गनायझेशन च्या आटोमिक रिसर्च अँड एनालेसिस विंग चे संचालक आहेत.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अहेरी 29 नोव्हेंबर :- पुरुषोत्तम योजना अंतर्गत राणी दुर्गावती विद्यालय, आल्लापल्ली येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळीविशेष अतिथी म्हणून विनोद कुमार उपस्थित होते. ते आता युनायटेड नेशन्स (UNO ) ऑर्गनायझेशन च्या आटोमिक रिसर्च अँड एनालेसिस विंग चे संचालक ( डायरेक्टर) आहेत. त्यांनी IIT प्रवेश परीक्षेत प्रथम, IIT परीक्षेत भारतात प्रथम, IAS परीक्षेत भारतात प्रथम, त्यांनतर कोईम्बतूर (तामिळनाडू ) येथे कलेक्टर, नन्तर युनायटेड नेशन च्या प्रवेश परीक्षेत जगात द्वितीय, विभागीय परीक्षेत पुन्हा जगात प्रथम, जागतिक व्यापार संघटनेत वरिष्ठ अधिकारी, आणि आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील युनोच्या अणुबॉम्ब आणि रिसर्च शी संबंधित संघटनेचे संचालक आहेत.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अतिथी विनोदकुमार च्या हस्ते मानव विकास मिशन अंतर्गत प्राप्त 11 विद्यार्थिनींना सायकल वाटप, गरजू आणि होतकरू 118 विद्यार्थ्याना कपडे वाटप, तसेच 25 गरीब महिला माता पालक यांना साडी वाटप करण्यात आले. नंतर उपस्थितांना भोजन आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, झोपेत स्वप्न पडते ते खरे नसते तर स्वप्न तेच खरे ज्यामुळे झोप उडते. प्रत्येक प्रयत्न आपल्याला यशाच्या आणखी जवळ नेतो. यशस्वी होण्यासाठी जिद्द, प्रयत्नांची पराकाष्ठा आवश्यक असल्याचे प्रतिपादन विनोद कुमार यांनी केले.अतिशय समर्पक अशा दैनंदिन जीवनातील उदाहरणांमधून मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्राम पंचायत आल्लापल्लीचे सरपंच शंकर मेश्राम यांनीही शालेय जीवनात शिस्त कठोर परिश्रम यांचे महत्त्व सांगितले. मुख्याध्यापक गजानन लोनबळे यांनी पुरुषात उत्तम अशा पुरुषोत्तम व्यक्तीमत्वाचे पासून प्रेरणा घेऊन विद्यार्थी आणखी जोमाने अभ्यास करतील आणि उत्तम व्यक्ती बनतील अशी आशा व्यक्त केली. व्यापारी संघटनेचे पदाधिकारी अध्यक्ष चंद्रकिशोर पांडे, उपाध्यक्ष अमोल कोलपाकवार, सचिव अमित पेम्पकवर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना अहेरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोंड, पांडे लाईनमन, विनोद कॉवरी, सामाजिक कार्यकर्ता अजुपठाण, जीसस कुमारजी, पवन नल्लावार, आदि उपस्थित होते.
संचलन व प्रास्ताविक गणेश पहापळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीनिवास कारेंगुलवार यांनी केले. यशस्वीतेसाठी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी, मा विश्वभारती सेवा संस्थेचे पदाधिकारी, प्रतिष्ठित नागरिक, तसेच राणी दुर्गावती विद्यालयाचे, ज्ञानेश्वर गोबाडे, लक्ष्मण दाशरथी,सत्येंदर सिलंमवार, ख्याती कश्यप, हेमलता धाबेकर, संजय कुमरे, आरती गेडाम, सचिन मावलीकर, माधुरी पंदिलवार, सोहेल शेख, सय्यद शेख,पल्लवी भीमनपल्लीवार, श्रीनिवास पेद्दी, शांता मांडोरे, नामदेव मांडोरे, खंडरे, रोहित मांडोरे, आदींचे सहकार्य लाभले.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.