Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

काँग्रेसच्या माजी आमदाराच्या पुत्राला डॉक्टर ला मारहाण करणे भोवले आरमोरी पोलीसाकडून अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 

गडचिरोली, १३ मे : आरमोरी येथे कोविड  सेंटरवर कार्यरत असलेल्या डॉक्टर मारबते यांना आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्या पुत्राने कोविड केअर सेंटर वर मारहाण केल्याने  लारेन्स आनंदराव गेडाम यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अटक करण्यात आली आहे .

कोविड  केअर सेंटर उपजिल्हा रुग्णालय आरमोरी अंतर्गत आदिवासी मुलांचे शासकीय निवासस्थान कोर्टाच्या मागे असलेले या ठिकाणी कार्यरत असलेले कोविड  केअर सेंटर मध्ये नोडल ऑफिसर म्हणून शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभिजीत मारबते यांचे सहकाऱ्यासह कोविड  पेशंट तपासणी व औषधी देण्याचे काम करीत असताना दिनांक 12 -5- 2021 रोजी सायंकाळी 6.45   वाजता च्या सुमारास  लारेन्स आनंदराव गेडाम वय 20 वर्षे राहणार आरमोरी यांनी  पेशंटला  औषधी देण्याचे कारणावरून डॉक्टर अभिजीत मारबते यांच्याशी वाद घालून त्यांना अश्लील शिवीगाळ करून त्यांच्या अंगावर धावून जाऊन हाताने चेहऱ्यावर कानावर थापडा ची  मारहान केली  डॉक्टर मारबते हे शासकीय काम करीत असताना त्यांच्यावर हल्ला केला धाकाने शासकीय कामापासून परावृत्त केले म्हणून डॉक्टर अभिजित मारबते यांनी आरमोरी पोलीस स्टेशन मध्ये दिलेल्या तक्रारीवरून आरमोरी येथील माजी आमदार आनंदराव गेडाम यांचा मुलगा लारेंस आनंदराव गेडाम वय  वीस वर्ष आरमोरी यांच्याविरुद्ध आरमोरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हा क्रमांक रजिस्टर 147 /  2021 भां. द. वि. कलम 353, 332, 294, 504 सह महाराष्ट्र मेडिकेअर पर्सन्स व मेडिकेअर इन्स्टिट्यूशनस प्रीवेंसंन ऑफ व्हायलेसेस, लॅस  डामेज टू प्रापर्टी अक्ट 2019 चे कलम 4 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी लारेन्स  गेडाम यास ताब्यात घेण्यात आले आहे या सर्व घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोडसे करीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

पोलीस- नक्षल चकमकीत C60 जवानांनी दोन नक्षल्यांना घातले कंठस्नान गडचिरोली पोलिसांना मोठे यश..

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

१८ ते ४४ वयोगटाला तूर्त लस मिळणार नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 

 

Comments are closed.