Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

बेसिन कॅथलिक बँकेची कॅश लुटताना चोरट्याना शिताफीने अटक

भिवंडी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

भिवंडी, दि. ११ नोव्हेंबर : बेसीन कॅथलिक को-ऑपरेटीव्ह बँक लि शाखा, कोर्णाक आर्केड भिवंडी यांची कॅश बॅकेत भरणा करण्याकरीता जातांना लुटणाऱ्या आरोपींना अटक करून रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दिनांक २९/१०/२०२२ रोजी बेसीन कॅथोलिक को-ऑपरेटीव्ह बँक लिचे क्लर्क रिजॉय जोसेफ फरेरा, व त्यांचे सेक्युरीटी हे दुपारी बँकेची ११.७५ लाख रोख रक्कम आय. डी. बी. आय. बॅक कल्याण रोड शाखा येथे भरणा करणेकरीता जात असतांना त्यांना दुपारी ०४.०० वा. सुमारास कल्याण रोडला लाईटच्या ट्रान्सफॉर्म जवळ, पंजाब नॅशनल बॅकेचे समोर, भिवंडी येथे झोमॅटोचे टी-शर्ट घातलेले व दोघां काळे हेल्मेट घालून पल्सर मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांचे मोटरसायकलला धक्का मारून मोटर सायकलवर पाठीमागे बसलेल्या झोमॅटो टी-शर्ट परिधान केलेल्या इसमाने फिर्यादी कॅशीयर यांचे हातातील नमुद रकमेची बॅग खेचून जबरी चोरी करून कल्याणच्या दिशेने पळून गेल्याने त्याबाबत भिवंडी शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. ४४३ / २०२२ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे दि. २९/१०/२०२२ रोजी दाखल करण्यात आला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर गुन्हयाचा तपास हा मा. पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ – २, भिवंडी योगेश चव्हाण, सहा. पोलीस आयुक्त, पुर्व विभाग, किशोर खैरनार, सहा. पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, भिवंडी सुनिल वडके यांचे मार्गदर्शनाखाली वपोनि चेतन काकडे, पोनि / गुन्हे, गंगाराम वळवी, तपास पथकाचे सपोनि / शरद पवार व पोउनि / रविंद्र पाटील तसेच तपास पथकाचे अंमलदार पोहवा / ३२९२ खाडे, पोना/५५५९ कोळी, पोना/कोदे, पोना / पवार, पोना / मंगेश जाधव व पोशि/भोसले यांनी गुन्हा घडल्यापासून अहोरात्र मेहनत घेवून भिवंडी व परीसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तसेच घटनास्थळ व अन्य ठिकाणचे डम्प डाटा घेवून तांत्रिक तपास करून आरोपींचे नावे व मोबाईल नंबर निष्पण्ण केले व आरोपींनी गुन्हा केल्यानंतर ते उत्तरप्रदेश येथे पळून गेल्याचे निष्पण्ण झाल्याने सपोनि / पवार व नमुद तपास पथकातील अंमलदार यांना ताबडतोब लखनऊ, उत्तरप्रदेश येथे पाठवून तेथील एस. टी. एफ. पथकाची मदत घेवून आरोपीना अटक केली.

आरोपी अरशद मोहम्मद इलियास मोह मन्सुरी, वय २२ वर्षे, रा. गेट नं. २, मस्जिदच्या मागे, नारपोली पोलीस स्टेशनच्या जवळ, अजमेर नगर, नारपोली, भिवंडी, जि. ठाणे. मुळगांव – ग्राम साई बगदाद, मल्लावा, हरदोई, राज्य उत्तरप्रदेश., अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी, वय २४ वर्षे, राह. २७४, हुदा मस्जिद जवळ, समदनगर, कणेरी, भिवंडी, जि. ठाणे. मुळगांव- मु. अवसान कुईया, पो. अजगरा, थाना- पथरा, जि. सिध्दार्थनगर, राज्य उत्तरप्रदेश यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी गुन्हयाची कबुली दिली व तेथेच त्यांच्याकडून गुन्हयातील ०३ लाख रूपये रोख रक्कम व त्यांनी गुन्हा करतांना एकमेकांशी संभाषण केलेले ०३ मोबाईल हस्तगत केले व आरोपींचा ट्राझिट रिमांड घेवून आरोपींना भिवंडी येथे आणून दिनांक ०९/११/२०२२ रोजी अटक करून त्यांचा दिनांक १५/११/२०२२ रोजी पावेतो पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आला तसेच गुन्हयात आणखी निष्पण्ण झालेला व पाहिजे असलेला आरोपी नामे सैफअली मोह. मुस्तफा खान, वय २५ वर्षे, व्यवसाय सोफा गादी तयार करणे, राह. जैतून अपार्टमेंट बिल्डींग, सी. विग, ३ रा माळा,समदनगर, कणेरी, भिवंडी, जि. ठाणे. मुळगांव – पिपलपतीया, थाना रिदोली, जि. बस्ती, राज्य उत्तरप्रदेश याला दिनांक १०/११/२०२२ रोजी अटक करून त्याचेकडून गुन्हयातील ०३ लाख रूपये हस्तगत करण्यात आले. तसेच याअगोरदर दोन अटक आरोपी यांचेपैकी आरोपी अब्दुल सईद अब्दुल वफा चौधरी याचेकडून ०२ लाख हस्तगत करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

नमुद आरोपीकडून अदयापपावेतो गुन्हयातील ०८ लाख रुपये व गुन्हा करतांना वापरलेले ०३ मोबाईल किंमती ३३,०००/-रु. तसेच ०१ लाख रू. किं. ची बजाज पल्सर २२० मोटर सायकल, एक चाकू, झोमॅटोचे ०२ टि-शर्ट व बॅग असा एकूण ९,३३,००० /- रू. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्हयामध्ये मा. पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२, भिवंडी. योगेश चव्हाण साहेब, सहा. पोलीस आयुक्त, पूर्व विभाग, भिवंडी  किशोर खैरनार, सहा. पोलीस आयुक्त, पश्चिम विभाग, वडके साहेब व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतन काकडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस तपास पथकातील सपोनि / पवार हे तपास करीत आहेत.

 

 

 

 

Comments are closed.