Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

घरफोडी करणारा आरोपी गजाआड

26 लाख 60 हजार रूपए किंमतीचे रोख रक्कम व सोन्याचे दागीने हस्तगत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मीरा-भाईंदर,  08 नोव्हेंबर :- काशिमीरा पोलीस गुन्हे शाखा कक्ष 1 ने घरफोडी करणार्या आरोपी शिताफिने अटक करण्यात यश मिळवले आहे. आरोपीकडून रोक रक्कम आणि सोन्याचे दागीने असा एकुण 26 लाख 60 हजार रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे. फरमान जावेद खान व्यवसाय रिक्षा ड्रायव्हर रा. प्लाॅट नं. 20 मालवणी गेट नं. 5, मदर टेरेसा स्कूल जवळ मालवणी मालाड प. असे आरोपीचे नाव आहे.

सविस्तर माहिती अशी की, तक्रारकर्ती तरन्नुम जावेद खान यांच्या घराचे लॅंच तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले पैसे व दागीने असा एकुण 26 लाख 60 हजार रूपए चोरी जाण्याची तक्रार मिरारोड पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानंरर गुन्हे शाखाकक्ष 1 काशिमीरा यांच्याकुडन घटनास्थळाची पाहणी केली असता आणि फिर्यादी कडून मिळालेल्या माहिती नुसार हा गुन्हा फिर्यादीचा भाउ फरमान जावेद खान याने केल्याचा संशय बळावला. याच संशयाच्या आधारे त्यांचा शोध घेतला असता तो आपल्या पत्नी, मुलगा व मेहुणी सोबत कुठेतरी निघुन गेल्याची माहिती मिळाली. यावेळी गुन्हे शाखा कक्ष 1 चे अधिकारी व अंमलदारांनी तीन वेगवेगळ्या टीम तयार करून तपास पथके शोध घेण्यास पाठविले. सदर टीम कडून वेगवेगळ्या रेल्वे स्टेशन वरून मिळविण्यात आलेल्या तांत्रिक माहितीवरून हा आरोपी गुजरात राज्यात पळून जात असल्याचे निदर्शनास आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

या माहितीच्या आधारे तपास पथकाने आरोपी याची वापी, सुरत, वलसाड परिसरात शोध घेतला असता वलसाड राज्य गुजरात येथून आरोपीस 6 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. आरोपी फरमान जावेद खान यांची चैकशी केली असता त्याच्या कडून रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेले 6 मोबाईल असा एकुण 25 लाख 24 हजार 500 रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कार्रवाई पोलीस उपआयुक्त विजयकांत सागर, सहा. पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनात पोनि अविराज कुराडे, सपोनि पुष्पराज सुर्वे, पोउपनिरी हितेंद्र विचारे, राजू तांबे, संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, प्रफुल्ल पाटील, विकास राजपुत, सचिन सावंत, समीर यादव, प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी यांनी केली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.