Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आपल्या गायवर्गीय पशुधनाचे तात्काळ लसीकरण करावे – जिल्हाधिकारी संजय मीणा

गडचिरोली जिल्ह्यात लम्पी आजाराची लागण, सतर्कता बाळगुन नियमांचे पालन करण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 08 नोव्हेंबर :- महाराष्ट्र राज्यातील जळगांव, अहमदनगर, अकोला, पुणे, धुळे, लातुर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद, सांगली, सोलापुर, कोल्हापुर जिल्ह्यामध्ये गायवर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादूर्भाव झाल्याचे निष्पन्न होत आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शिवणी येथील पशुधनामध्ये पहिल्यांदा लम्पी स्किन डिसिज सदृष्य लागण झाल्याचे निदर्शनात आले आहे. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या गायवर्गीय पशुधनाचे तात्काळ लसीकरण करावे असे आवाह्न जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकुल 4,30,000 लसमात्रा प्राप्त झाली असून आजपर्यंत 4,04,446 इतके लसीकरण करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील शिवणी येथील पशुधनामध्ये पहिल्यांदा लम्पी स्किन डिसिज सदृष्य लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. सदर बाधित जनावरांचे रोग नमुने गोळा करण्यात आले असून रोगाची खात्री करण्याकरीता प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्या ठिकाणापासून 5 किमी परिसर सर्तकता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. सर्तकता क्षेत्राम कनेरी, पुलखल, मुडझा बु, मुडझा तु, वाकडी, डोंगरगाव बु, डोंगरगाव तु, हिरापुर चक व कृपाळा या गावांचा समावेश आहे. सदर गावात एकुण 4310 इतके लसीकरण झाले आहेत. तरी सदर क्षेत्रातील गावांमध्ये लसीकरणातून काही जनावरे सुटली असतील तर त्यांना नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखायात नेउन तात्काळ लसीकरण करावे असे आवाह्न जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लम्पी चर्मरोग बाधित पशुमध्ये दिसून येणारी लक्षणे पाहता या आजारात पशुंना ताप येणे, पूर्ण शरीरावर 10-15 व्यासाच्या कडक गाठी येणे, तोंड नाक व डोळ्यात व्रण निर्माण होणे, चार चघळण्यास त्रास होणे, अशक्तपणा, भुक कमी होणे, वजन कमी होणे, दुध उत्पादन कमी होणे, डोळ्यातील व्रणामुळे दृष्टी बाधित होणे, काही वेळा फुफुसदाह ंिकवा स्त्रदाह होणे, पायावर सुज येउन लंगडणे, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होणे अशी लक्षण दिसून येतात. या रोगाने बाधित जनावरे दोन-तीन आठवड्यात बरी होतात. त्यामुळे वेळीच उपचार करून घ्यावा असे पण जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.