Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

भविष्यकाळामध्ये गद्दाराच्या बदला घेण्यासाठी सज्ज व्हा  – संपर्कप्रमुख बबनराव थोरात 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भोकर, 08 नोव्हेंबर :-  दर्जेदार कार्यकर्त्याला ताकद देऊन लोकप्रतिनिधी बनवण्याची ताकद आमच्यात आहे.गद्दाराने चिन्ह गोठवलं पण निष्ठावंताचे रक्त पेटले भविष्यकाळामध्ये गद्दाराच्या बदला घेण्यासाठी सज्ज व्हा असे आव्हान नांदेड हिंगोली उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी भोकर येथे केले. पुढे बोलताना बबनराव थोरात म्हणाले की शिवसेनेमधून आमदार खासदार निघून गेले पण आजही बाळासाहेब ठाकरे यांच्यावर श्रद्धा ठेवणारा शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा आहे.

भोकर येथे माऊली मंगल कार्यालय येथे आढावा बैठक घेण्यात आली. या आढावा बैठकीस प्रकाश शजी मारावार, मनोज भंडारी, डॉ. बी.डी. चव्हाण, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बबनराव बारसे, नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख. शिवसेनेचे तालुकाप्रमुख माधव पाटील वडगावकर. शहर प्रमुख पांडुरंग वर्षेवार. संतोष आलेवाड यांची उपस्थिती होती.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

288 मतदार संघामध्ये गावागावांमध्ये आपली फौज उभी करायची आहे. पदाधिकारी निवडी मध्ये अनेक कार्यकर्त्यावर अन्याय झाला. श्रद्धा आणि सबुरी ठेवा श्रद्धा शिवसेने वरती ठेवा सबुरी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर ठेवा. वेळ आली तर शंभर टक्के प्रत्येकाला न्याय मिळेल. तू मोठा की मी मोठा यापेक्षा आपली शिवसेना मोठी. यासाठी प्रत्येकाने काम करणे आवश्यक आहे. संधी प्रत्येकाला मिळेल. चाळीस आमदार निघून गेले खासदार निघून गेले परंतु मातोश्री मध्ये उद्धव साहेब ठाकरे येणाऱ्या निवडणुकीमध्ये शंभर आमदार निवडून येण्याचे नियोजन करत आहे. बारा तेरा खासदार निघून गेले तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये 48 खासदार निवडून येण्याची रणनीती उद्धव ठाकरे करत आहे. ती रणनीती यशस्वी करण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावं. असे आव्हान नांदेड जिल्ह्याचे संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांनी केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख कोकाटे. बबन भाऊ बारसे. माजी नगरसेवक समाजसेवक बाळासाहेब देशमुख. विश्वंभर पाटील मुदखेड यांनी विचार मांडले. या शिवसेनेच्या आढावा बैठकीस मोठ्या प्रमाणात शिवसैनिक उपस्थित होते.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.