Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबीकडून अभिनेत्री दीया मिर्झाची माजी मॅनेजर राहिला फर्निचरवालाला अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क, दि. ५ फेब्रुवारी : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील ड्रग्ज केस संदर्भात एनसीबी कसून तपास करत आहे. एनसीबीने याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. यामध्ये एक ब्रिटिश नागरिक करण सजनानी आहे. तर दुसरी सेलिब्रिटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आहे. राहिला बॉलिवूड अभिनेत्री दीया मिर्जाची असिस्टंट होती. या दोघांना गुरुवारी रात्री उशिरा एनसीबीकडून अटक करण्यात आली होती.

एनसीबीने गेल्या महिन्यात 200 किलोग्राम ड्रग्स जप्त केल्या होत्या. यासंबंधित प्रकणात सजनानी आणि फर्निचरवाला यांना अटक केली होती. दोघांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नव्यानं काही पुरावे हाती लागल्यानंतर एनसीबीने त्यांना पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. या दोघांच्याही चौकशीसाठी एनसीबीनं वॉरंट काढलं होतं.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांसह आतापर्यंत या प्रकरणी 33 लोकांना अटक करण्यात आली होती. गुरुवारी एनसीबीने आणखी एका व्यक्तीला अटक केली आहे. या व्यक्तीचं ना जपताप सिंह आनंद असं आहे. तसेच यापूर्वी करनजीत उर्फ केजे याच्या भावाला अटक केली होती. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सजनानी आणि फर्निचरवाला या दोघांचा संबंध या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या अनेक लोकांशी आहे. त्यामुळे त्या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.

एक प्रकरणात एनसीबीला सुशांत सिंह राजपूतचा मित्र आणि माजी असिस्टंट डायरेक्टर ऋषिकेश पवार यालाही एनसीबीने अटक केली होती. मंगळवारी पोलिसांनी बराच वेळ चौकशी केल्यानंतर ऋषिकेश पवारला अटक केली होती. ऋषिकेश पवारवर सुशांतला ड्रग्जची सवय लावल्या आरोप लावण्याक आला आहे. एका ड्रग पेडलरसोबतच सुशांतच्या घरी काम करणाऱ्या दीपेश सावंतनेही ऋषिकेश पवारचं नाव घेतंल होतं.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.