Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली पोलीस पथकाने एकाच रात्री तीन वेगवेगळ्या घटनेत साडेनऊ लाखांचा अवैध मुद्देमाल केला जप्त

गडचिरोली पोलीस विभागाची धडक कारवाई ने अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले....

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

गडचिरोली, 29 जुलै : गडचिरोली पोलीस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर वेगवेगळ्या ठिकाणाहून अवैध वाहनाने दारूसाठा येत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त होताच गडचिरोली पोलीस विभागाने दोन पथके तयार करून त्यातील एक पोलीस पथक मुरखळा गावात जाणाऱ्या रस्त्यावर पाळत ठेवले तर दुसरे पोलीस पथक कोटगल चौकात सापळा रचून बसले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

यात मुरखळा गावात जाणाऱ्या रस्त्यावर दुचाकीवरून 28,800 रुपये किमतीचा दोन बॉक्स विदेशी दारू वाहतूक करताना मिळून आले असता. दारूची अवैध वाहतूक करणारे अमित यशवंत रोहनकर मोखाडा तालुका- सावली जिल्हा चंद्रपूर यांना मुद्देमाला सह ताब्यात घेतले.  तर दुसरीकडे कोटगल चौकात सापळा रचून बसले असता दुसऱ्या घटनेत संशयित दुचाकी वाहन घेऊन येत असल्याने दिसताच तपासणी केली असता त्या ईसमाजवळ 40 नग विदेशी दारूच्या बाटल्या मिळून आल्या असून.येलंधर मलय्या गनबोईनवार, वय 47 वर्षे, रा. कनेरी ता.जि. गडचिरोली, (2) विनोद मधुकर मेश्राम, वय 28 वर्षे, रा. पारडी ता. जि. गडचिरोली यांना मुद्देमाल व वाहनासह ताब्यात घेवुन पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गडचिरोली कॉम्प्लेक्स परीसरात नाकाबंदी दरम्यान एका संशयीत वाहनास थांबण्याचा ईशारा करताच वाहन चालकाने वाहनाचा वेग कमी करुन दरवाजा उघडुन पळुन जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांस ताब्यात घेवुन त्याचे व पंचासमक्ष वाहनाची तपासणी केली असता, वाहनात 2,48,000/- रुपये किंमतीच्या देशी दारुचे एकुण 31 बॉक्स व दारु वाहतुकीकरीता वापरलेले चारचाकी मिळुन आल्याने ईसम नामे आकाश पुरुषोत्तम कापकर, वय 30 वर्षे, व्यवसाय – वाहन चालक, रा. सर्वोदय वार्ड क्रमांक 4, गडचिरोली ता. जि. गडचिरोली याचेविरुध्द पोस्टे गडचिरोली येथे गुन्हा नोंद करण्यात आला.
एकाच रात्रो अशा एकुण वेगवेगळ्या तीन घटनामध्ये 2,88,800/- रुपये किंमतीचा दारु मुद्देमाल व 6, 60,000/- रुपये किंमतीचे दारु वाहतुकीकरीता वापरलेले वाहन असा एकुण 9,48,800/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल  व अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी, पोलीस उपनिरीक्षक  दिपक कुंभारे, सपोनि राहुल आव्हाड, यांचे नेतृत्वात नापोशि/दिपक लेनगुरे, अकबर पोयाम, सतीश कत्तीवार, पोअं/ श्रीकांत बोईना, श्रीकृष्ण परचाके, प्रशांत गरफडे, मंगेश राऊत, चापोना/मनोहर तोगरवार, माणिक निसार यांनी केलेली आहे.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.