Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आष्टी पोलीसांनी परराज्यात कत्तलीसाठी विक्रीस नेणाऱ्या गोवंश तस्करी करणाऱ्या ओपीस ठोकल्या बेळ्या

आष्टी पोलीसांनी पाच किमी अंतर पाठलाग करून गो तस्करांच्या आवळल्या मुसक्या.....

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 28 जुलै –  तेलंगाना राज्यात तस्करी करून कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या गोवंश तस्करी करणाऱ्यांची मोठी टोळी जेरबंद करण्यात आष्टी पोलिसांना यश आले आहे. अहेरीचे प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी जंगल परिसरात तीन ते चार किलोमीटर पाठलाग करत चार आयशर वाहनांसह एक पीकअप वाहन जप्त केले आहे.

गोपनिय माहितीदाराकडून माहिती प्राप्त झाली असता, 04 आयसर व 01पिकअप वाहनामध्ये अवैधरित्या गोवंश जातीचे जनावरे दाटीवाटीने भरुन तेलंगाना राज्यात कत्तली करीता कोनसरी ते जैरामपुर मार्गे घेवून जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांना मिळाल्याने सदर माहीतीच्या अनुषंगाने आष्टी पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी कोनसरी ते जैरामपुर जंगल परिसरात नाकाबंदी करुन ०४ आयसर व ०१ पिकअप वाहन ताब्यात घेतले. त्यावेळी त्यातील काही आरोपी जंगल परिसराचा फायदा घेवून पळून जाण्याचा प्रयत्न केले परंतु त्यांना 4 ते 5 कि. मी. पाठलाग करुन पकडण्यात आले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सदर कारवाईत एकुण 58,००,०००/- किंमतीचा मुद्देमाल – जप्त करण्यात आला असून त्यामध्ये 04 आयसर व ०1पिकअप वाहन व त्यामध्ये एकुण 104 गोवंश जातीचे जनावरे ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाईत १) शेख अब्दुल शेख बक्शु २) शेख मोबीन (शेख ३) शेख आरीफ शेख नझीर ४) शेख आरीफ शेख बाबा ५) चंद्रशेखर गाधाम या आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यामधील ईतर 3 असे एकुण 8 आरोपीतांवर पोस्टे आष्टी येथे गुन्हा क्र. 187 / 2023 कलम 429, 34 भादवी, सहकलम5 (अ), (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1955 (सुधारणा) तसेच सहकलम 3,11 (ड) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 तसेच सहकलम 119 महा. पोलिस अधिनियम 1951 तसेच सहकलम 130 / 177 मोटार वाहन अधिनियम १1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोउपनि अजय राठोड हे करीत आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.