Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

विवाहित तरुणाचा चिखलाने माखलेल्या स्थितीत आढळला मृतदेह

अल्लापल्ली शहरातील घटना..

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,

सचिन कांबळे

अलापल्ली दि २९ : साई मंदिर परिसरात एका विवाहित तरुणाचे चिखलाने माखलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याने खडबड उडाली आहे..

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

मृतकाचे नाव राकेश कन्नाके ( ३७) असून अल्लापल्ली येते शेंडे चक्की जवळ राहते घर असून पाच वर्षांपूर्वी विवाह झाला आहे.
तर अल्लापल्ली शहरात नुकतेच नवरात्र महोत्सव दरम्यान भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .त्याच ठिकाणी मृतकाचे शव आढळून आल्याने घातपात की अन्यकारण स्पष्ट झाले नाही.मात्र परिवारातील सदस्यांनी रात्री ९: ३० दरम्यान जेवण करून घरबाहेर पडला त्यानंतर घरी परतलाच नाही. शेवटीं सकाळी घटनेची बातमीच मिळाली, त्यामुळे नक्कीच घटना घडवून आणली आहे,  कारण मृतकाचे पाय तुटले असून डोक्याला जबर मारहाण करून चिखलात फेकून दिल्याचे आरोप करण्यात आले आहे तर दुसरीकडे तपास चक्र फीरवून आरोपीचा छडा लावणे पोलीस विभागासमोर मोठा आवाहन असल्याने घटनेची माहिती पोलीसांना मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे तसेच पोलीस कर्मचारी उपस्थित होवून अधिक तपास केला जात आहे.

मृतक हे मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी व चार वर्षाची एकुलती एक मुलगी असून आई ,वडील , दोन भावड ,बहीण असा आप्त परिवार आहे .

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मृतक राकेश मिळेल ते काम करून आपला. उदरनिर्वाह करीत प्रपंच चालवीत होता. तसेच प्रत्येकाशी सौजन्याने वागत होता. मात्र अचानक मृत अवस्थेत चिखलात माखून आढळून आल्याने अनेकांचे भुवया उंचावले आहे नेमकं कारण काय ? कोणी घडवून आणले असले असे अनेक तर्क वितर्क करीत प्रश्न नागरिक निर्माण करीत आहे.

तर दुसरीकडे पोलीस घटनास्थळी पोहचून मोका पंचनामा करून मृतदेह शविच्छेदनासाठी अहेरी उपजिल्हा रुग्णालयात येथे पाठविण्यात आले आहे. शववि्छेदन आणि चौकशी नंतरच अधिक माहिती देता येणार असल्याचे लोकस्पर्श न्युज ला पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांनी स्पष्ट केले आहे..

Comments are closed.