Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

लाचखोर सरकारी वकील ACB च्या जाळ्यात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मनोज सातवी,

पालघर दि,२६ : अतिरिक्त सत्र न्यायालय पालघर येथील सरकारी वकील सुनील बाबुराव सावंत यांना ७ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.निर्दोष मुक्त झालेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांकडून पदोन्नती अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. एका सरकारी वकिलाला लाच घेताना पकडल्यामुळे पालघर न्यायालयातील वकील तसेच जिल्यातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.तर दुसरीकडे जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराला लगाम घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अशीच धडाकेबाज कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सुनील सावंत हे गेल्या सात वर्षांपासून पालघर
येथील नायालयात सरकारी वकील म्हणून कामकाज पाहत आहेत. पालघर जिल्हा पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर सन २०१५ मध्ये तारापूर पोलीस ठाण्यात कलम ३७६ प्रमाणे दाखल झाला होता. या प्रकरणी जून २०२३ मध्ये न्यायालयाने तक्रारदाराला निर्दोष मुक्त केले होते. त्यामुळे त्यांनी पालघर जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाकडे पदोन्नतीसाठी अर्ज केला होता.

पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अर्थात सरकारी वकील सुनील सावंत यांच्याकडे पत्रव्यवहार करून निर्दोष सुटल्याबाबत अहवाल मागण्यात
आला होता. तो अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयास देण्यासंबंधी सावंत यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती सात हजार रुपये लाचेची रक्कम देण्याचे ठरवण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

याबाबत तक्रारदार पोलीस कर्मचाऱ्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता त्यांनी साफळा रचून लाचखोरी सरकारी वकील सुनील सावंत कडून याला पालघरमधील हुतात्मा स्तंभाजवळ रंगेहाथ पकडले.

पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, संजय सुतार, नवनाथ भगत, नितीन पागधरे, योगेश धारणे, निशिगंधा मांजरेकर, स्वाती तारवी आणि जितेंद्र गवळी यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली आहे.

यावेळी पालघर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी यांनी ” कोणत्याही शासकीय अधिकारी,कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम  एजेंट याने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलूचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन सर्व नागरीकांना केलं आहे.

 

Comments are closed.