Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोठी बातमी : बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव, दोन दिवसात होणार निर्णय – शिक्षणमंत्र्यांची घोषणा

बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाने आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

मुंबई डेस्क : शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्या संदर्भातील प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवला आहे. अजून त्यावर अंतिम निर्णय झालेला नाही.

बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करु, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. काल केंद्राने सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रीमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली. त्यानुसार आम्ही बारावी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवत आहोत.

ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय़ घेतील. त्यानंतर आम्ही बारावी परीक्षा निर्णयाबाबत कळवू. मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली होती. ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे. मुंबई हायकोर्टात सरकार बाजू मांडेल. सरकार उद्या होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडेल, असंही वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बारावीच्या १४ लाख विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.  सीबीएसई, आयसीएसई, हरयाणा आणि गुजरात सरकारनं देखील बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा :

‘त्या’… महिलेचे रेल्वे पोलिसांनी वाचविले प्राण

गडचिरोली जिल्ह्यात आज 3 मृत्यूसह 69 नवीन कोरोना बाधित तर 51 कोरोनामुक्त

 

 

 

Comments are closed.