Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गोंडवाना विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे महामहिम राज्यपाल, येणार गडचिरोली दौऱ्यावर

  • पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे दीक्षांत समारंभास व विविध लोकार्पण सोहळ्यास राहणार उपस्थित.
  • राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हर्ष चव्हानही राहणार उपस्थित.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, दि. 09 ऑक्टोंबर: राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, भगत सिंह कोश्यारी सोमवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी दुपारी गडचिरोली दौऱ्यावर येत आहेत. मंगळवार, दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी एमआयडीसी, गडचिरोली येथे सीआरपीएफ ग्राऊंडवर सायकल रॅली काढली जाणार आहे त्याठिकाणी राज्यपाल महोदय यांचे हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला जाणार आहे. त्याच दिवशी सकाळी गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभाच्या सोहळ्यास अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रीय अनुसूचित जनजाति आयोगाचे अध्यक्ष हर्ष चव्हान हे मंगळवार, दिनांक 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी गडचिरोली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. दुपारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली मधील अधिकाऱ्यांसोबत त्यांची कार्यालय बैठक आहे.

गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेही राहणार उपस्थित

सोमवार, दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी सायंकाळी पालक मंत्री जिल्हा दौर्‍यावर येत आहेत. मंगळवार, दि. 12 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी सीआरपीएफ एमआयडीसी, येथे मा.राज्यपाल महोदय यांचे हस्ते होणऱ्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या नवव्या दीक्षांत समारंभालाही उपस्थित राहणार आहेत. दुपारी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन एल.एम.ओ.प्लान्ट आणि पी.एस.ए.प्लॅंट उद्घाटन सोहळ्यास तसेच रुग्ण वाहिका वाटप कार्यक्रमास होणार आहे. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सामान्य रुग्णालय येथे चार वाजता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments are closed.