Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वन्यजीव सप्ताहात बाईक रॅलीचे आयोजन करून चातगाव वनपरिक्षेत्रात केली जनजागृती

वन्यजीव संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने उपक्रमांची आखणी करण्यात आली.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

१ ते ७ ऑक्टोंबर वन्यजीव सप्ताह दरम्यान गडचिरोली वनवृत्तात विविध उपक्रम राबवून जनजागृती करण्यावर अधिक भर दिला आहे, गडचिरोली व वडसा वन विभागात वाघाने धुमाकूळ घातला असून काही लोकांना जीवास मुकावे लागले, त्यामुळे गडचिरोली , वडसा या दोन वन विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त निर्देश दिले असून गावखेड्यातील आणि जंगलालगत असलेल्या सर्व गावांमध्ये जनजागृती करा आणि जंगलात एकटे जाण्यापासून गावकऱ्यांना मज्जाव करा, महत्त्वाचे काम असेल तर वनात चार ते पाच लोक घोळक्याने जावे, याही सूचना केल्या आहेत, याशिवाय वन्यजीवांचे अधिक महत्त्व पटवून देण्यासाठी भर दिला असून आणि मी स्वतः शक्य तितक्या ठिकाणी जाऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहे.

डॉ. किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली,

गडचिरोली,दि,९ ऑक्टोबर : राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहांतर्गत १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान गडचिरोली वनवृताच्या  वतीने विविध उपक्रम राबवून वन्यजीव सप्ताह साजरा केला . या  सप्ताहात वन्यजीव संवर्धनाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या दृष्टीने गावागावात विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली होती .

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

सप्ताहाच्या शेवटच्या दिनी दि, ७ ऑक्टोबरला डॉ. किशोर मानकर वनसंरक्षक गडचिरोली यांच्या मार्गदर्शनात   डॉ. कुमारस्वामी उपवनरक्षक गडचिरोली, मा. शेख सर (आय एफ एस),सोनल भडके सहायक वनरक्षक गडचिरोली , संजय पडवे वनपरिक्षेत्र अधिकारी चातगाव  यांच्या  नेतृत्वात वन कर्मचाऱ्यामार्फत भव्य बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

सकाळी ७:३० वाजता चातगाव वनपरिक्षेत्र कार्यालयातून रॅलीला सुरूवात करण्यात आली . रॅलीद्वारे  वन्यजीव व वन्य प्राणी यांच्याविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली. बाईक रॅली सावरगाव, मोरडोंगरी, बाम्हणी, भगवानपूर, उसेगाव, आंबेशिवनी, आंबेटोला, भिकारमौशी, कळमटोला, धुंडेशिवनी, अमिझा, गिलगाव, खुर्सा मार्गे  तसेच वाघाचे अधिवास असलेल्या क्षेत्रात वाघाच्या स्वभाव हालचाली विषयी माहिती देउन नागरिकांना जनजागृती  करून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आले.

या रॅलीकरीता राकेश तांबे क्षेत्रसहायक, सिद्धार्थ मेश्राम, राजेश दुर्गे, संदिप आंबेडारे, रूपेश आनंदपवार, संजय खोब्रागडे, रूपेश मेश्राम आदिंचे महत्वाचे सहकार्य लाभले. रॅलीमध्ये चातगाव परिक्षेत्रातील सर्व क्षेत्रीय कर्मचारी व वनमजूर स्थानिक गावातील युवक ,शेतकरी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

हे देखील वाचा,

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याचा आदेश हायकोर्टाने केला रद्द.

मोठी बातमी,एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर,राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागामध्ये वाढ.

दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम.

आलापल्ली- सिरोंचा मार्गावरील खड्डे १५ दिवसात बुजवा. खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निर्देश

Comments are closed.