Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दिवानी व फौजदारी न्यायालयाच्या वतीने कायदे विषयक जनजागृती कार्यक्रम.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

कोरची,दि.९ ऑक्टोबर : दिवाणी व फौजदारी न्यायालय, कुरखेडा अंतर्गत दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोजी आजादी का अमृत महोत्सवी कायदेविषयक नागरिकात  जनजागृती करण्यासाठी अधिवक्ता व विधी पॅनल मार्फत कार्यक्रमाचे उदघाटन करून नक्षलग्रस्त,आदिवासी बहुल भागात रॅली काढून कायदेविषयक माहिती पोहचविण्याचा प्रारंभ करण्यात आला.

कुरखेडा तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये पॅनल अधिवक्ता व विधी स्वयंसेवक/स्वयंसेविका यांच्या माध्यमातून लोकांमध्ये कायद्याची जनजागृती व्हावी. यासाठी विविध कायदेविषयक सभा घेण्यात आल्या, ठिकठिकाणी माहिती पत्रके देण्यात आले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

कुरखेडाचे  मा.दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) तथा तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष मा. के.जी.मेंढे, यांच्या मार्गदर्शनात यशस्वीपणे पार पाडण्यात येत असून दिनांक ०८ ऑक्टोबरला यु.एन. वालदे, पॅनल अधिवक्ता व विधी स्वयंसेवक/स्वयंसेविका- नेपाल जनबंधु, रवींद्र डोकरमारे, विनोद प्रधान, विक्रम मोहने, मेघा भांडारकर, सोनी बारसागडे यांनी कोरची तालुक्यातील बेडगाव, कोरची, दवंडी, कोचीनारा व पकानाभट्टी इत्यादी नक्षलग्रस्त व अतिदुर्गम गावांत तसेच शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती पत्रके देवून  नागरिकांमध्ये कायद्याविषयी जनजागृती करून विधी सेवा समिती मार्फत मिळणाऱ्या मोफत योजनांची माहिती दिली .

हे देखील वाचा,

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मोठी बातमी,एमपीएसीकडून नवं परिपत्रक जाहीर,राज्य सेवा परीक्षेच्या १०० जागामध्ये वाढ.

नगराध्यक्ष योगिता पिपरे यांना अपात्र करण्याचा आदेश हायकोर्टाने केला रद्द.

Comments are closed.