Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

जाती दावा पडताळणीबाबत व्यावसायीक पाठयक्रमात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी व निवडणुक उमेदवारांकरीता त्रृटी पूर्ततेकरीता विशेष मोहीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 

गडचिरोली, दि. ३१ डिसेंबर : २०२१-२०२२ या सत्रात व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशास पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी तसेच मार्च- २०२१ मध्ये निवडणुकीत विजय झालेले (अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इमाव व विमाप्र) उमेदवारांनी जाती दावा पडताळणीचे प्रस्ताव जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली येथे सादर केलेले आहेत. परंतु ज्यांना अद्याप पर्यंत ई-मेल द्वारे जात वैधता प्रमाणपत्र मिळालेली नसल्यास सदर प्रस्तावामध्ये जाती दावा सिद्ध करणारे सबळ पुरावे नसल्याने त्यांचे प्रकरण त्रृटीमध्ये असल्याने त्यांना यापुर्वी दुरध्वनी, भ्रमणध्वनी व पत्राद्वारे त्रृटी पुर्तता करणेसंदर्भात कळविण्यात आले आहे. मात्र ज्या अर्जदारांनी व निवडणुक उमेदवारांनी अद्यापही त्यांचे जाती दावे पडताळणी संबंधित आवश्यक ते मानीव दिनांकापुर्वीचे जातीचे व वास्तव्याच्या नोंदीचे पुरावे सादर केलेले नाहीत. अशा अर्जदारांना व निवडणुक उमेदवारांना त्रृटी पुर्ततेकरीता संधी देण्यात येत असून, त्यांनी त्रृटी पुर्ततेबाबत आवश्यक ते पुरावे मुळ प्रतीसह दि.03.01.2022 व दिनांक 04.01.2022 रोजी सोमवार व मंगळवारला सादर करणेसाठी कळविण्यात आले आहे. त्रृटीपुर्ततेकरीता सबळ पुराव्यासह समिती कार्यालयात उपस्थित राहावे.

तसेच ज्या अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्र तयार होऊनही ज्यांनी अद्याप समिती कार्यालयात जमा असलेली मुळ जात प्रमाणपत्र नेलेले नाही त्यांचे पालक वा सख्खे भाऊ, बहिण यांनी अर्जदाराचे व स्वत:चे ओळखपत्र (मुळ व झेरॉक्स), जात वैधता प्रमाणपत्राची झेरॉक्स घेऊन तात्काळ मुळ जात प्रमाणपत्र प्राप्त करावे असे उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे देखील वाचा : 

टीईटी परीक्षा घोटाळ्याचं दिल्ली कनेक्शन उघड

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

बल्लारपूर औद्योगिक नगरीत हिंस्त्र वन्यप्राण्यांचा वाढला उपद्रव!

येत्या फेब्रुवारी महिन्यात ८ वे अ.भा.मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन

 

Comments are closed.