Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

2 डिसेंबरला होणार ‘एकदम कडक’ मराठी चित्रपट रिलीज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई,  08 नोव्हेंबर :-  ‘एकदम कडक’  हा मराठी चित्रपट 2 डिसेंबरला रिजीज होत आहे. या चित्रपटात अभिनेते माधव अभ्यंकर, शशांक शेंडे, पार्थ भालेराव, तानाजी गलगुंडे, अरबाज, चिन्मय संत तसेच अभिनेत्री रूक्मिणी सुतार, भाग्यश्री मोटे, गायत्री जाधव, प्रांजली कंझारकर, जयश्री सोनुने या कलाकारांचा अभिनय पाहवयास मिळणार आहे.

‘एकदम कडक’ चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. नुकताच या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळा संपन्न झाला. यावेळी चित्रपटातील कलाकारांनी उपस्थित राहुन आणि मानसीच्या ‘एकदम कडक’ अशा ‘मॅडम कडक हाय’ या गाण्याच्या परफाॅर्मन्सने कार्यक्रमाची शोभा वाढविली. आपल्या डान्स कौशल्य आणि सौंदर्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री मानसी नाईत सातत्याने चर्चेत येत असते. सोशल मिडीयावरही ती सक्रीय असून नवनवे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आता ती पुन्हा एकदा ‘एकदम कडक’ चित्रपटातील’ मॅडम कडक हाय’ या गण्यामुळे चर्चेत आली आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

‘मॅडम कडक हाय’ हे गाण ‘ओ शेठ’ फेम सुप्रसिध्द गायक उमेश गवळी यांनी त्यांच्या दमदार आवाजात स्वरबध्द केले आहे. तर चित्रपटातील अन्य गाणी प्रसिध्द गायक अवधूत गुप्ते, सौरभ साळुंखे, सायली पंकज यांनी गायली असून या चित्रपटाला संगीत स्व. नरेंद्र भिडे, पंकज पडघन, उमेश गवळी यांनी दिले. गीतकार म्हणून मंगेश कांगणे आणि गणेश शिंदे ने बाजू सांभाळली आहे. ओम साई सिने फिल्म प्रस्तुत आणि दिग्दर्शक गणेश शिंदे दिग्दर्शित आणि निर्मित एकदम कडक हा चित्रपट येत्या 2 डिसेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.