Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

आज दिसेल वर्षाती शेवटचे खग्रास चंद्रग्रहण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 08 नोव्हेंबर :- आज वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. यावर्षातील हे दुसरे चंद्रग्रहण आहे. भारतात त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी यंदा खग्रास चंद्रग्रहण आहे. जेव्हा सुर्य आणि चंद्र यांच्यामध्ये पृथ्वी येते तेव्हा चंद्रग्रहण होते. भारतात चंद्रग्रहण दिसणार असल्याने त्याचा सुतक कालावधी वैध असेल. देशाच्या ईशान्येकडील राज्यांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसणार आहे. तर अन्य ठिकाणी आंशिक चंद्रग्रहण दिसेल. 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी चंद्र उगवताच भारतात चंद्रग्रहण दिसणार आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवसी मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी 2022 वर्षातील शेवटचे ग्रहण दिसणार आहे. हे ग्रहण संपूर्ण चंद्रग्रहण असेल. भारतामधील चंद्रग्रहणाची सर्वसाधारण वेळी ही सायंकाळी 5 वाजून 32 मिनिट ते 7 वाजून 27 मिनिट इतकी आहे. चंद्रग्रहण हे ग्रस्तोदित असल्याने 8 नोव्हेंबर ला सुर्योदयापासून मोक्षापर्यंत म्हणजेच संध्याकाळी 6 वाजून 19 मिनिटापर्यंत ग्रहणाचे वेध पाळले जातील. लहान मुल, आजारी व्यक्ती, अशक्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांच्याकरीता वेध पाळण्याचा कालावधी सकाळी 11 वाजल्यापासून सुर्यास्तापर्यंत असणार आहे. ग्रहण ही सामान्य खगोलीय घटना असली तरीही शास्त्रानुसार ग्रहणाच्या वेळेस काही नियम पाळण्याची रीत आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

भारताशिवाय चंद्रग्रहण अमेरिका, आॅस्ट्रेलिया, आशिया आणि पॅसिफिकमध्ये दिसणार आहे. हे चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेला देव दीपावलीच्या तारखेला होईल. दिवाळीनंतर आता कार्तिक पौर्णिमेलाही चंद्रग्रहण दिसणार आहे. 15 दिवसांच्या अंतराने हे दुसरे ग्रहण असेल. हे संपुर्ण चंद्रग्रहण भारतात पाहता येणार आहे. भारताच्या काही भागांमध्ये संपूर्ण चंद्रग्रहण दिसेल तर बहुतांश भागांमध्ये आंशिक चंद्रग्रहण दिसेल. भारतात 8 नोव्हेंबरच्या संध्याकाळी चंद्र उगवताच पहिले चंद्रग्रहण ईयाान्य दिशेला दिसेल. पहिले पूर्ण चंद्रग्रहण अरूणाचल प्रदेशात दिसणार आहे. आंशिक चंद्रग्रहण ईशान्येचा भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात दिसणार आहे.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.