Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्ती अभावी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन धुळखात पडून

तालुक्यातील 133 गावातील गरोदर मातांना 60 ते 70 किमी अंतर कापून करावी लागते सोनोग्राफी.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, 

कोरची, दि. २५ डिसेंबर : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू, व कुपोषण दर कमी करण्यासाठी शासन अनेक योजना तयार करतो याचं एक भाग म्हणून आरोग्यवर्धनी केंद्र भारुन गरोदर मातांना याचा लाभ व्हावा हा उद्धार हेतू शासनाचा असला तरी एकही डॉक्टर आरोग्यवर्धिनी केंद्रात उपस्थित राहत नाही तर स्त्री रोग तज्ञ डॉक्टर अभावी ग्रामीण रुग्णालयाची सोनोग्राफी मशीन धुळखात पडून आहे.

गडचिरोली जिल्हा मुख्यालया पासुन १२० किमी अंतरावर असलेल्या कोरची तालुका हा आदिवासी बहुल नक्षलग्रस्त तालुका असून या तालुक्यातील गरोदर मातांना व गरजु रुग्णांना सोनोग्राफीचा लाभ मिळावा याकरिता प्रशासनातर्फे कोट्यवधी रुपये खर्च करून सोनोग्राफी सेंटर सुरू करण्यात आले परंतु सदर मशीन हाताळून रिपोर्ट देणारे डॉ नियुक्ती न केल्याने मागील कित्येक महिन्यापासून सोनोग्राफी मशीन धूळखात पडून आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

त्यामुळे तालुक्यातील १३३ गावातील लोकांसाठी उभारण्यात आलेल्या ३० बेडचे ग्रामीण रुग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन प्राथमिक आरोग्य पथक, सहा आरोग्य वर्धनी केंद्र मधून तपासणी करून पाठवलेल्या गरोदर मातांना ६० ते ७० किमी अंतरावर असलेल्या आरमोरी येथील सोनोग्राफी सेंटरला सोनोग्राफी करण्याचे अधिकार दिलेले आहे त्या बदल्यात प्रति सोनोग्राफी मागे त्या त्या सोनोग्राफी सेंटरला शासन मोबदला देत असते त्यात गरोदर मातांना ये-जा करण्यासाठी शासनाची गाडी उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती आहे मग शासन सोनोग्राफी सेंटरला शासकीय दराने मोबदला देत असेल आणि गाडी आणि डिझेलचा खर्च करत असेल तर ग्रामीण रुग्णालय कोरची ला सोनोग्राफी हाताळणारे टेक्निशियन डॉक्टरची व त्यावर निदान करणाऱ्या स्त्रीरोग डॉक्टर तज्ञाची नियुक्ती करणे गरजेचे आहे.

एकेकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी व कुपोषण निर्मूलन करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करीत असताना जिथे दगड उचलला तिथे डॉक्टरांची शासनाने नियुक्ती केली पण एकही डॉक्टर मुख्यालय हजर राहून आरोग्याची सेवा देतात असे कुठेही दिसत नाही त्यामुळे आंधळा दडतोय आणि कुत्र पीठ खातोय अशी आरोग्य विभागाची अवस्था झालेली आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

कोरची ग्रामीण रुग्णालय व दोन प्राथमिक आरोग्य केंद्र गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या १२० ते १६० किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे थोडी जरी अडचण आली तरी ग्रामीण रुग्णालयातून गरोदर मातांना रेफर करून कोरची ग्रामीण रुग्णालय आपले हात वर करून घेतो किंवा केव्हा तर वाटेतच बऱ्याच स्त्रियांची प्रसुती झालेली आहेत त्यामुळे अतिदुर्गम असलेला कोरची मध्ये स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केल्यास माता मृत्यू व बालमृत्यू रोखण्यास व कुपोषण मुक्त करण्यास हातभार लागेल.

कोरची येथील ग्रामीण रुग्णालय मध्ये क्ष किरण तज्ञ व स्त्री रोग तज्ञ डॉक्टर ज्यांची सोनोग्राफी मशिन हाताळण्याची ट्रेनिंग झालेल्या व्यक्तीची नियुक्ती नसल्यामुळे सोनोग्राफी मशीन बंद आहे. यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केलेला आहे.

डॉ अभय थूल – 
अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय कोरची

हे देखील वाचा: 

टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

वाशिम येथील जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत…

 

Comments are closed.