Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

त्वचेवरही दिसतो मधुमेहाचा परिणाम

सुरूवातीच्या टप्प्यातच ओळखा मधुमेहाची लक्षणे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मुंबई, 14 नोव्हेंबर :- बदलती लाईफस्टाईल आणि अनहेल्दी आहार यामुळे मधुमेहासारख्या आजारांचे प्रमाण नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही वर्षापूर्वी हा आजार वृध्दांना होणारा आजार म्हणून ओळखला जायचा. मात्र आता त्याचे तरूणांमध्ये ही प्रमाण लक्षणीय आहे. केवळ वृध्द आणि तरूणांनाच नाही तर आता लहान मुलांनाही याचा त्रास होत आहे. वेळीच या आजाराकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही तर तो इतर अनेक गंभीर आजारांनाही जन्म देउ शकतो. भारतात सुमारे 77 मिलियन लोक मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त आहेत.

मधुमेहाच्या रूग्णाला आयुष्यभर अटी आणि शर्तींसह जगावे लागते. शरीरातील सरखरेची पातळी वाढविणार्या गोष्टींपासून त्यांना नेहमीच दुर राहावे लागते. म्हणूनच या आजाराची ओळख सुरूवातीच्या टप्प्यावर व्हावी आणि त्यावर उपचार सुरू करणे खुप महत्वाचे आहे. अनेक वेळा लोकांना मधुमेह होतो पण त्याची लक्षणे समजत नाही. जेव्हा तुम्हाला मधुमेह झाला असतो तेव्हा तुमच्या शरीराची त्वचा तुमच्या साखरेची पातळी जास्त असल्याचे संकेत देउ लागते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

काहीवेळा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त झाल्यास त्वचा लाल होउ लागते. यासोबतच तुम्हाला तुमची त्वचा तापल्यासारखी वाटू शकते. पण हे मधुमेहामुळेच असेल असे नाही तर ते बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे देखील होउ शकते. सोरायसिसचा त्रास कोणालाही असू शकतो. परंतु टाईप 2 असलेल्या रूग्णांना तो होण्याची शक्यता अनेकपटींनी जास्त असते. यामध्ये त्वचेवर संसर्ग झाल्यामुळे त्या ठिकाणी त्वचेचा एक कडक थर तयार होतो आणि रूग्णांना खाज सुटते. शरीराच्या वरचा भाग जाड होणे हेही मधुमेहाचे सामान्य लक्षण आहेत. पाठीच्या वरच्या भागात जाड आणि कडकपणा वाटणे, तसेच खांद्याचा भाग किंवा मान जाड झाल्यासाखे वाटणे हे ही मधुमेहाचे लक्षण आहेत.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.