Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

11 ला भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाची बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

गडचिरोली, 08 नोव्हेंबर :- अण्णा हजार प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाची जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन 11 नोव्हेंबर शुक्रवारी दुपारी 12 वा. चंद्रपूर रोड वरील सर्कीट हाउसला करण्यात आले असून या बैठकीला कार्यकर्त्यानी उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केले आहे.

अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे गडचिरोली जिल्ह्यातील दहा तालुक्यात काम सुरु असुन अण्णा हजारे यांच्या आंदोलनातुन तयार झालेले ग्रामसभा, माहितीचे अधिकार, दप्तर दिरंगाई व अन्य जनहितार्थ असलेल्या कायद्याची जनतेमध्ये जागरुकता निर्माण व्हावी व प्रशासनातील मनमर्जीपणा नियमबाह्य कारभार यावर अंकुश ठेवणे व येणा-या काळात लोकायुक्त व जनलोकपाल कायदा तयार होण्या करीता अण्णा हजारे यांचे राज्यव्यापी आंदोलन होणार असुन विविध सामाजीक संघटना व जनतेने आंदोलनात सक्रीय सहभाग नोंदविण्या करीता शहरी भागापासुन तर ग्रामीण भागा पर्यंत जनजागृती होणे काळाची गरज आहे.  तसेच शेतक-याना योग्य न्याय मिळावा त्यांचेवर अन्याय होणार नाही या करीता भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन शेतकरी व बेरोजगार युवक, युवतीच्या बाजुने उभा राहील. शासन, प्रशासनात पारदर्शता येण्या करीता जेष्ट समाजसेवक अण्णा हजारेंच्या पविञ विचाराची गरज असुन बैठकी मध्ये कार्यकर्त्याना योग्य मार्गदर्श दिले जाणार. या करीता राज्य समिती विश्वस्त डाँ शिवनाथजी कुंभारे तसेच विदर्भातील चंद्रपुर नागपूर, गोंदीया येथील जिल्हाध्यक्ष उपस्थीत राहणार आहेत.  सदर बैठकला  जिल्हाभरातील सर्व तालुक्यातुन जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यानी उपस्थीत राहण्याचे आवाहन भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी केले आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

 

Comments are closed.