Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

तक्रारकर्तांनी आपल्या तक्रारी समन्वयाने सोडवाव्यात

भिवंडी महानगरपालिके तर्फे नागरिकांना आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

भिवंडी, 08 नोव्हेंबर :-  लोकशाही दिनात तक्रारकर्तांनी आपल्या तक्रारी आणून समन्वयाने त्या सोडवाव्यात असे आवाहन भिवंडी महानगरपालिका तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले. 7 नोव्हेंबर म्हणजे पहिल्या सोमवारी भिवंडी महानगरपालिका स्तरावी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महानगरपालिकाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी कार्यक्रमाची अध्यक्षता केली.

यावेळी पुढील लोकशाही दिन हा दिनांक ५ डिसेंबर २०२२ रोजी होणार असल्याने नागरिकांनी त्यांच्या तक्रारी दोन प्रतीत दिनांक १८/११/२०२२ पूर्वी माहिती व जनसंपर्क विभागाकडे पाठवणे आवश्यक आहे. लोकशाही दिनी अर्जदार यांनी स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्जदार यांची तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची असणे आवश्यक आहे. तक्रारदारांबरोबर त्रयस्थाने येण्याची आवश्यकता नाही. एका तक्रारी अर्जात एकच तक्रार असावी, एकापेक्षा अनेक तक्रारी असलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. तक्रारदाराने प्रथम मनपा स्तरावरील लोकशाही दिनामध्ये अर्ज करणे अनिवार्य आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

लोकशाही दिनात खालील बाबींची संबंधित अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
१) न्यायप्रविष्ट/ प्रकरणे
२) राजस्व / अपील
३) सेवाविषयक, आस्थापना विषयक बाबी.
४) विविध नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज.
५) अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज.
६) तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसेल तर.

तसेच कोणत्याही राजकीय पक्षाच्या, लोकप्रतिनिधीच्या, संस्थेच्या लेटरहेडवरील अर्ज स्वीकारला जाणार नाही याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी, असे जाहीर आवाहन भिवंडी महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-

Comments are closed.