Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पोलीस नक्षल चकमकीत कसनसुर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा

एटापल्ली तालुक्यातील पहिली जंगल परिसरातील घटना. राज्याचे गृह मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांची पत्रकार परिषदेत माहिती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्र परिसरातील पहिली जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या सी-६० जवानांसोबत आज २१ मे रोजी सकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान पोलीस नक्षल चकमक होऊन कसनसूर दलमच्या १३ नक्षल्यांच्या खात्मा करण्यात पोलिस दलास यश आले आहे. या चकमकीत आणखी काही नक्षली जखमी झाले असावेत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी आज पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेस अप्पर पोलीस महासंचालक संजय सक्सेना, गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल नक्षलविरोधी अभियानाचे अप्पर पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

पहिली जंगल परिसरात नक्षलवादी दरवर्षीप्रमाणे तेंदूपत्ता हंगामाच्या पार्श्वभूमीवर खंडणी वसूल करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात एकत्र येतात त्यामुळे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना आज सकाळच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ६० ते ७० नक्षल्यांनी सिक्सटी जवानांना ठार मारण्याच्या व हत्यारे लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

त्यावेळी पोलिसांनी नक्षल्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले मात्र नक्षल्यांनी शरण न येता पोलिसावर आणखी हल्ला चढविला यामुळे सी-६० जवानांनी प्रत्युत्तरादाखल नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. या वेळी दीड तास चाललेल्या या चकमकीत नक्षल्यांनी पोलिसांचा वाढता दबाव पाहून घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात सी-६० जवानांनी शोध मोहीम राबविली असता घटनास्थळी ६ पुरुष नक्षलवादी ७ महिला नक्षलवादी अशा १३ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. ठार झालेल्या नक्षल्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच यात एके ४७, एसएलआर, कारर्बाईन, ३०३, १२ बोअर इत्यादी रायफल, भरपूर प्रमाणात स्फोटके आणि नक्षल्यांचा दैनंदिन जीवनात वापरात येणारा साहित्य मिळून आल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

गृह मंत्री ना. दिलीप वळसे पाटील यांनी सी-६० जवानांच्या या कामगिरीचे पत्रकार परिषदेत कौतुक केले.

हे देखील वाचा : 

सी-60 जवान व नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या धुमचक्रीत 13 नक्षल्याना कंठस्नान

Comments are closed.