Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

चोरीच्या 30 मोटर सायकली जप्त, 3 आरोपींना अटक

वजीराबाद गुन्हे शाखेचे यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

नांदेड, 19,ऑक्टोबर :-  वजीराबाद गुन्हे शोध पथकाकडून चोरीच्या 30 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून 21,80,000 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपींमध्ये शेख अरबाज उर्फ कोबरा शेख चाॅद रा. दर्गारोड पारवागेट परभणी, आरेज खाॅंन उर्फ आमेर पिता अयुब खाॅंन रा. मोठा मारोती देशमुख गल्ली परभणी, मोहम्मद मुक्तदीर उर्फ मुक्का मोहम्मद अथर रा. शाही मज्जीद, स्टेडीअम रोड परभणी चा समावेश आहे.

नांदेड शहरामध्ये वाढत्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांच्या संदर्भात नांदेड पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, अप्पर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन मध्ये सूचना देउन चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालून चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल जप्त करण्याचे आदेश दिले होते.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

वजीराबादचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी चालु वर्षात ज्या ज्या ठिकाणी मोटरसायकलीचे गुन्हे घडले आहेत, त्या  ठिकाण जाउन तेथील सीसीटिव्ही फुटेज चेक करून गुन्हेगारांची चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदारांना दिले होते. शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी यासर्व ठिकाणांच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी करून आरोपीचा शोध घेण्यास सुरूआत केली.

यावेळी मोटरसायकल चोर परभणी येथे असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीसांनी परभणीत सापळा रचून चोरीच्या आरोपींना अटक करण्यात आली. पोलीसीखाक्या दाखवताच आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबूली दिली व त्यांच्या कडून एकुण 30 मोटरसायकल ज्याची किमत 21,80,000 जप्त करण्यात आले आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

पुढील तपास वजीराबाद के सहा. पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, गजानन किडे, विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे, संतोष बेलुरोड, व्यंकट गंगलुवार, रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार करत आहेत.

हे देखील वाचा :-

Comments are closed.