Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

अट्टल दुचाकी चोर अटकेत

अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा यांची कार्रवाई

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

अमरावती, 19 ऑक्टोबर :- मोर्शी उपविभागात दुचाकीसह शेतातील मोटरपंप आणि केबल वायर चोरून हैदोस घालणारा अट्टल गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखा अमरावती  ग्रामीण पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव अशोक मोहन युवताने रा. पांढरघाटी ता. वरूड जि. अमरावती असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती वरून  पोलीस स्टेशन मोर्शी येथे विशाल कन्हैया दाभोडे रा. आठवडी बाजार मोर्शी यांनी आपली होंडा कंपनीची युनिकाॅन काळ्या रंगाची दुचाकी क्र. एम एच 27 बी आर 1713 चोरी गेल्याची तक्रार नोंदविली होती. त्या तक्रारी संबंधी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दुचाकी अशोक मोहन युवनाते कडे असल्याची माहिती 18 ऑक्टोबर 2022 ला दुपारी सुमारास प्राप्त होताच चौकशी अंती पोलीसांनी कार्यवाही करून पांढरघाटी येथून आरोपी अशोक युवनाते याला ताब्यात घेउन पोलिसांच्या कात्या दाखवताच  त्याच्या जवळून काळ्या रंगाची युनिकाॅन दुचाकी जप्त करण्यात आली. त्यांची अधिक विचारपुछ केली असता त्याने मोर्शी, वरूड येथून विविध कंपनीच्या एुकण 6 दुचाकी चोरी केल्या असून 4 दुचाकी मध्यप्रदेश मधील रोहना, मांजरी, ईटावा येथे विकल्या असून 2 मोटार सायकली त्याच्या जवळ मिळून आल्या.  6 दुचाकी आरोपीसह मध्यप्रदेशमधून जप्त करण्यात आल्या. तसेच आरोपी ने वरूड हद्दीतील जरूड, वरूड, रोशनखेडा, खडका येथील शेतातून पाणबुडी मोटर व केबल, ग्राम ईसंब्री, पाळा, भाईपुर मेघवाडी शेतातून केबल वायर चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक शशीकांत सातव, पोलीस निरीक्षक तपन कोल्हे स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाने, रविंद्र बावणे, बळवंत दाभने, दिपक सोनाळेकर, चंद्रशेखर खंडारे, पंकज फाटे, दिनेश कनोजिया, हर्षद घुसे यांनी केली.

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

मल्लिकार्जुन खरगे काॅंग्रेसचे नवे अध्यक्ष

सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड सुरूच !

Comments are closed.