Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

“सर्च” रुग्णालयात 35 मानसिक रुग्णांनी शिबिरात घेतला उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

 गडचिरोली, 03 जुलै – धानोरा तालुक्यातील चातगाव येथील “सर्च” रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे चार वेगवेगळ्या गावांमध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. या शिबिरांच्या माध्यमातून एकूण ३५ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला.

सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे नेहमीच गावपातळीवर मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात येते. या महिन्यात सुद्धा वेगवेगळ्या चार गावामध्ये मानसिक आरोग्य शिबीर घेण्यात आले. यात मारकेगाव, खरकाडी, दाराची आणि वडगाव या गावातील ३५ मानसिक रुग्णांनी उपचार घेतला. यामध्ये मुख्याता उदासीनपणा, चिंता-चिंता वाटणे, नैराश्य, यावर निदान व उपचार करण्यात आला. व जास्तीत जास्त रूग्णांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. अशा प्रकारच्या एकदिवसीय मानसिक आरोग्य शिबिरांची मालिका पुढे पण सुरू राहणार आहे. हे मानसिक आरोग्य शिबीर सर्च रुग्णालयातील मानसिक आरोग्य विभागाद्वारे आयोजित करण्यात येते. सदर शिबिरचा लाभ परिसरातील गरीब व गरजू रुग्णांनी घ्यावं , असे आवाहन सर्च रुग्णालयातर्फे करण्यात आले आहे.

 

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.