Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पिंपळगाव येथील विक्रेत्यांचा मोहफुलाचा सडवा नष्ट

गाव संघटना व मुक्तिपथची कृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

मुंबई, 03 जुलै – देसाईगंज तालुक्यातील पिंपळगाव येथील गावालगत जंगल परिसरात आणि एका विक्रेत्याच्या घर परिसरात आढळून आलेल्या जवळपास ६० हजारांचा मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची संयुक्त कृती गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूने केली.

पिंपळगाव येथे गाव संघटना व मुक्तिपथ तालुका चमूची बैठक पार पडली. या बैठकीत गावातील सध्यस्थिती जाऊन घेत दारूविक्रेत्यांविरोधात कृती करण्यावर चर्चा करण्यात आली. दरम्यान, एका विक्रेत्याने दारू गाळण्यासाठी मोहफुलाचा सडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमू व गाव संघटनेच्या महिलांनी एका घरी भेट देऊन घर परिसराची पाहणी केली असता, जवळपास ६० हजार रुपये किमतीचा मोहफुलाचा सडवा व साहित्य आढळून आले. संपूर्ण मुद्देमाल नष्ट करून पुन्हा अवैध दारूचा व्यवसाय न करण्याची विक्रेत्यास तंबी देण्यात आली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

अवैध दारूविक्री बंद करण्यासाठी ग्राम पंचायत समिती यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे . गाव संघटनेला ग्राम पंचायत समितीच्या साथीची गरज आहे. विशेष म्हणजे पिंपळगाव हे पेसा गाव असून पेसा महिला ग्राम सभेतही दारूबंदीचा ठराव घेण्यात आलेला आहे . तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी गावकर्यानकडून होत आहे.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

हे पण वाचा :-  

Comments are closed.