Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू गोंडवाना विद्यापीठाच्या १० व्या दीक्षांत समारंभात संबोधित (भाषण) करणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे पहिल्यांदाच भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या १० व्या दीक्षांत समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून समारंभात उपस्थित होवून संबोधित (भाषण)करणार आहेत.या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस असतील तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री धर्मराव आत्राम, कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

गडचिरोली दि. ३ जुलैगोंडवाना विद्यापीठ गडचिरोली  येथे पहिल्यांदाच भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू या १० व्या दीक्षांत समारंभाच्या मुख्य अतिथी म्हणून  ५ जुलै, २०२३ रोजी सकाळी १०.३० ते ११:३० समारंभात उपस्थित राहून संबोधित (भाषण) करणार आहेत. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस असतील तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मंत्री धर्मराव आत्राम, कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे, प्र-कुलगुरू डॉ श्रीराम कावळे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

गोंडवाना विद्यापीठाचा दहावा दीक्षांत समारंभ सकाळी १०.३० ते ११:३० या एक तासात कार्यक्रम पूर्ण केला जाणार आहे. यात विशेष प्राविण्य प्राप्त सहा विद्यार्थांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.तर विद्यापीठाच्या नवनिर्माणाधिन परिसराची कोनशिला ऑनलाईन पद्धतीने ठेवली जाणार आहे.

गोंडवाना विद्यापीठात पदवीदान समारंभात एकूण गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी २७८, प्रथम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी ६२, सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी ३९, तर आचार्य पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची एकूण संख्या १३७ आहे. यात विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा ४५, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा ८, मानव विज्ञान विद्याशाखा ५४, आंतर विज्ञान विद्याशाखा ३० इतक्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच विद्यापीठात पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी तब्बल २० हजार ५३५ आहेत. यात पदवीचे १५२३० तर पदव्युत्तर ५३०५ विद्यार्थी आहेत.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

गोंडवाना विद्यापीठाच्या  सभामंडपात १ हजार अतिथींची बैठक व्यवस्था केली असून यात २०० पोलीस विभागाचे अधिकारी आणि ८०० अतिथी असणार आहेत. अतिथींमध्ये व्हीव्हीआयपी, आणि व्हीआयपीसह विद्यापीठाच्या मोजक्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार असल्याचे कुलगुरूंनी सांगितले.

गोंडवाना विद्यापीठाच्या विकासाच्या दृष्टीने कार्यक्रमाचे मुख्य अतिथी काही महत्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यात विद्यापीठ परिसराठी लागणारा ८८५ कोटींचा प्रारुप आराखड्यास मंजुरी व निधी देण्याची घोषणा यासह गोंडवानाला ट्रायबल आणि फॉरेस्ट युनिव्हर्सिटी म्हणून विधीमंडळाच्या पावसाची अधिवेशनात मंजूरी देण्याची घोषणा केली जाऊ शकते. दीक्षांत समारंभात ३९ सुवर्ण पदकाचे मानकरी, ६२ प्रथम गुणवत्ता प्राप्त आणि २६४ गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत.

हे देखील वाचा, 

…आणि पुन्हा एकदा प्रगतीशील, सामान्य माणसाच्या हितासाठी कष्ट करणाऱ्यांचे राज्य निर्माण करूया – शरद पवार

काही काळ त्यांच्यासाठी थांबू,मात्र विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल – जयंत पाटील

“सर्च” रुग्णालयात 35 मानसिक रुग्णांनी शिबिरात घेतला उपचार

 

 

 

Comments are closed.